सख्ख्या चुलत भावाचा कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण खून

खांबाळा येथील प्रकरण: शेतीचा वाद ठरले कारण
वसमत/अनिल शितोळे: तालुक्यातील खांबाळा येथे तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. शेतीच्या वादातून तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाली, शेषेराव होडगिर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

सर्व शेती हे त्याचा मोठ्या काकाच्या नावावर आहे. आणि खूप दिवसापासून ते शेती वाटून मागत होते त्या पण दिवशी वाद झाला म्हणून तो काकाला व भावाला बोलण्या साठी गेला होता. पण चुलत भावाने कुऱ्हाडीने त्याच्या मानेत वार केला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. 

वडील कुंडलिक होडगीर यांचा फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर होडगिर गजानन होडगिर विठ्ठल होडगिर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पुलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या