गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करा: भीम आर्मीची मागणी

वसमत:  1978 पासून कसत असलेल्या शासकीय गायरान जमीनी वरील अतिक्रमण नियमित करून सात-बारा वर  नोंद घ्या भीम आर्मीची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी.
आम्ही मौजे मरसुळ तालुका वसमत येथील रहिवाशी असून मागासवर्गीय पैकी जातीने बोद्ध आहोत  (1) सोनाजी विठ्ठल गायकवाड (2) दामाजी कोंडबा भुरे (3) रामराव कोंडबा भुरे (4) विठ्ठल सटवाजी खंदारे (5) प्रल्हाद दामाजी खंदारे (6) यशवंत सटवाजी खंदारे (7) गोविंद सुदाम खंदारे (8) किशन नागोजी खंदारे (9) शेषराव मुकिंद खंदारे (10) केशव मुकिंद खंदारे (11) लिंबाजी कचरू खंदारे यांनी पत्नी (नंदाबाई लिंबाजी खंदारे) (12) नामदेव कचरू ढेंबरे (13) ज्ञानदेव कचरू ढेंबरे (14) जळबाजी कचरू ढेंबरे (15) नामदेव कोंडबा भुरे (16) मारोती श्रीपती खंदारे (17) उत्तम बाबा खंदारे 18) नागोराव लिंबाजी खंदारे (19) लक्ष्मण कोंडबा भुरे (20) नाथाजी डीगांबर खंदारे यांच्या पत्नी (जिजाबाई नाथाजी खंदारे) (21) रामचंद्र किशन खंदारे (22) आनंद सखाराम खंदारे (23) गोविंद सटवाजी खंदारे असे एकूण 23 जन साल सन 1978 पासून शिवार मरसुळ गट क्रमांक 16 व 17 मध्ये असलेली शासकीय गायारान जमीन आम्ही वाहीती करून परिवाराचा उदारणीर्वाह करून उपजीविका भागवत आहोत.

सदरील जमिनीचे सन 1990 पासून तहसील प्रशासना कडून जाय मोक्यावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामे केले आहेत तसेच तलाठी कार्यालयात असलेल्या गाव नमुना एक (ई)अतिक्रमण नोंद वहीत सुध्दा 1978पासून अतिक्रमण असल्याची नोंद घेण्यात आली आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालय मरसुळ यांनी दिनांक 09/03/2012 रोजी अतिक्रमण नियमित करणे बाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत अहोत, प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तताही केली परंतु पुढील कार्यवाही करून आमचे अतिक्रमण नियमित करून सात बारा वर नोंद घेण्यात आली नाही अशी मागणी आपल्या कडे दिनांक 18/02/2021 रोजी  निवेनाद्वारे केली होती त्या अनुषंगाने आपण 22/02/2021 रोजीच्या पत्रात नमूद केल्या प्रमाणे तहसील प्रशासनाने अतिक्रमण नियमाकुल करणे बाबत अद्याप प्रस्ताव सादर केला नाही सहा महिन्याचा कालावधी उलटला तरीही आजपर्यंत काहीच कार्यवाही करत नसून तहसील प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे.

आमच्या मागण्याची प्रशासनाने दखल घ्यावी व अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी ही मागणी घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही दिनांक 13/08/2021रोज शुक्रवार  रोजी आपल्या कार्यालया समोर भीम अर्मिच्या वतीने मुंढन आंदोलन करणार अशी मागणी  भीम आर्मीचे मराठवाडा सचिव तथा जिल्हा प्रमुख आनंद खरे, सोनाजी गायकवाड, दामाजी भूरे, रामराव भुरे, विठ्ठल खंदारे , प्रल्हाद खंदारे, यशवंत खंदारे, गोविंद खंदारे, किशन खंदारे, शेषराव खंदारे, केशव खंदारे, नंदाबाई खंदारे, नामदेव  ढेंबरे, ज्ञानदेव ढेंबरे, जळबाजी ढेंबरे,  नामदेव भुरे, मारोती खंदारे , उत्तम खंदारे , नागोराव खंदारे , लक्ष्मण भुरे, जिजाबाई खंदारे, रामचंद्र खंदारे, आनंद खंदारे, गोविंद खंदारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या