तरूणांनी सक्रीय राजकारणात येवून समाजाला दिशा द्यावी: राहूल प्रधान

हिंगोलीत आझाद समाज पार्टीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

कार्यक्रमाला उपस्थित पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते. तर दुसर्‍या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांचा सत्कार करण्यात आला.
हिंगोली: महाराष्ट्रातील तरूणांनी आता संघटना वाढीवर आपली ताकद खर्ची न घालता सरळ सक्रीय राजकारणात यावे. त्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने सक्षम असा प्लॅटफॉर्म देण्यात आला असून त्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन, आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांनी हिंगोलीत बोलताना केले. त्यांच्या उपस्थितीत आझाद समाज पार्टीची कार्यकर्ता संवाद जिल्हा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, एकेकाळी समाज माध्यमाचे कोणतेही साधन नसताना, त्यावेळच्या आमच्या नेत्यांनी चळवळ सक्षमपणे चालविली. आजमात्र तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले असताना आपला तरूण वर्ग त्याचा चांगल्या कामासाठी चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी तंत्रज्ञान व समाज माध्यमाचा वापर न करता केवळ शेअर आणि कॉमेंट यासाठीच वापर करीत आहेत आणि चळवळ चालवित आहेत. असे न करता, कार्यकर्त्यानी आता समाजात जावून काम केले पाहिजे आणि समाजाला न्याय दिला पाहिजे, असे प्रधान यांनी सांगितले. बहूजन समाजातील तरूण वर्ग आजघडीला सामाजिक काम करण्यासाठी राजकारणाला तुच्छ समजून केवळ संघटनेचे काम करीत असतात. परंतू कोणत्याही संघटनेचे अंतीम ध्येय हे सत्ता हस्तगत करणे हे असते आणि राजकारण त्यातून सत्ता हस्तगत केल्याशिवाय हेतूही साध्य होत नाही. असे जर असेल तर मग तरुण मंडळी भरकटत आहे? असा सवाल करून त्यांनी, महाराष्ट्रातील तरूणांनी आता संघटना वाढीवर आपली ताकद खर्ची न घालता सरळ सक्रीय राजकारणात यावे. त्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने सक्षम असा प्लॅटफॉर्म देण्यात आला असून त्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन, प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांनी केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अशोक चक्रवर्ती यांनी केले. तर प्रस्ताविक शहराध्यक्ष नासेर शाह यानी केले. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. मारोती सोनुले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश बिनगे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष प्रशांत बलखंडे, वसमतचे तालुकाध्यक्ष रुपेश सरोदे, हिंगोलीचे तालुकाध्यक्ष भास्कर घुगे, सेनगावचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत उबाळे, जिल्हासचिव गंगाधर मस्के, शहर महासचिव निशांत राऊत, युवा नेते अमोल गायकवाड, मिर्जा बैग,  रवी धवसे, रवी इंगोले, सतीश नवघरे, सायबखान पठाण, शेख बशीरभाई, गौतम इंगोले, गौतम सिरसाठ, माधव पंडीत, कांबळे सर, सुधाकर हनुवते, गौतम हनवते यांच्यासह जिल्हाभरातील युवक आघाडीचे पदाधिकारी, विधानसभा प्रभारी, विधानसभा अध्यक्ष,  सर्कल प्रमूख, शाखा प्रमूख मोठ्या संख्येने उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या