पती नपुंसक असल्याची महिलेची तक्रार; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

हिंगोली: आपला पती नपुसंक असून याबाबत त्याच्या आई वडील आणि इतर नातेवाईकांना माहिती असूनही, त्यांनी माझ्याशी लग्न लावून माझी फसवणूक केल्याची तक्रार सदर महिलेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेली तक्रार अत्यंत संवेदनशील असल्याने पती पत्नीची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. यातील पती हा हिंगोलीत राहतो. तर पत्नी तिचे माहेर जिंतूर येथे राहते. पत्नीने दिलेली तक्रार, केवळ नावे वगळून जशीच्या तशी पुढील प्रमाणे आहे. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांचेकडे तक्रार करण्यात आली आहे.
महोदय,
वरील विषयास अनुसरून की, मी सौ. ABC, वय 32 वर्षे, रा. हिंगोली, ह मु. जिंतूर येथील रहिवासी आहे. माझे लग्न दि. 05/05/2015 रोजी जिंतूर येथे XYZ (रा. हिंगोली) यांच्यासोबत झाले होते. लग्नाचे सुरुवातीचे दोन महिने आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले नाहीत. नवीन लग्न झाल्यामुळे या सर्व गोष्टींसाठी थोडा वेळ द्यावा असा विचार मी केला होता. नंतर मग मी XYZ यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळेस ते नेहमी मला टाळाटाळ करत असत. एके दिवशी आमच्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळेस त्यांनी मला स्पष्ट शब्दात समजावून सांगितले की, "मला स्त्रियांमध्ये काहीच रुची नाही, माझे माझ्या जवळच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध आहेत. 
मला समलैंगिक शारीरिक संबंध ठेवण्यास आवडते. ही गोष्ट माझ्या आई-वडिलांना व माझ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे. मी माझ्या आई-वडिलांना सांगितले होते की, मला लग्न करायचे नाही म्हणून. पण ते मला बोलले की, तुझं लग्न नाही केले तर आपली समाजात आणि नातेवाईकांत खूप बदनामी होईल. आम्हाला कुठेच समाजात व नातेवाईकांत तोड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे तुला हे लग्न करावेच लागेल. म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केले आहे. तुझे जर एखाद्या व्यक्ती सोबत प्रेम संबंध असतील, तर तू बिनधास्तपणे त्याला आपल्या घरी बोलत व तुझे कुणा सोबत संबंध नसतील तर मग तुझी शारीरिक गरज भागवण्यासाठी मी माझ्या एखाद्या मित्रांला पाठवतो." हे सर्व ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी याविषयी माझी सासू व इतर नातेवाईक यांच्याकडे विचारणा केली, तर त्यांनी मला हे सर्व खरे असल्याचे सांगितले. सुरुवातीचे काही दिवस तर मला काहीच सुचत नव्हते. नंतर मी माझ्या वडिलांनी दिलेला हुंडा परत मागितला व मला घटस्फोट देण्याची मागणी केली. त्यावेळेस वरील चौघांनी मिळून मला खूप मारहाण केली. माझ्या सासरचे लोक नेहमी मला मारहाण करून पैशांची मागणी करत होते. मी त्यांना बोलले की, " माझा XYZ हा नपुंसक आहे ही गोष्ट माझ्या माहेरच्या लोकांना सांगणार आहे." तर माझे नपुंसक XYZ यांनी मला बेदम मारहाण केली. माझ्यावरच खोटे आरोप केले. ते माझ्याबद्दल लोकांना व नातेवाईकांना सांगत होते आणि सांगत आहेत की, “ माझ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, माझी पत्नी चारित्र्यहिन आहे, तिचे अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध आहेत. माझी पत्नी मला शरीर सुख देत नाही, या उलट ती तिची शारीरिक गरज दुसऱ्या पुरुषांकडून भागवून घेते."

माझे नपुंसक पती XYZ यांनी मला माझ्या माहेरी जिंतूर येथे दि. 16/03/2016 रोजी मला मारहाण करून नेऊन घातले. घडलेला सर्व प्रकार मी माझे वडील OOO यांना सांगितला. तर उलट XYZ यांनी मलाच दोषी ठरवले. त्यानंतर मी घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. 
माझ्या वडिलांनी मला XYZ हे नपुंसक आहेत अशी तक्रार देऊ दिली नाही. पण आज रोजी माझे वडील जिवंत नाहीत. त्यामुळे मी माझ्यावर झालेल्या अन्यायाची आता तक्रार देत आहे. XYZ हे नपुंसक असून माझ्याच इज्जतीचे वाभाडे काढून आज समाजामध्ये इज्जतीने व सन्मानाने फिरत आहेत.
XYZ हा लॅबोरेटरी हिंगोली मध्ये चालवत आहेत. माझे पती हे नपुंसक आहेत का नाही हे एका पत्नीशिवाय दुसरे कोण चांगल्या प्रकारे सांगू शकते?. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक व मा. जिल्हाधिकारी यांना मी कळकळीची नम्र विनंती करते की, XYZ हे नपुंसक आहेत ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना माहित असून सुद्धा त्यांनी माझ्यापासून व माझ्या घरच्या लोकांपासून लपवून ठेवली. माझी व माझ्या घरच्यांची फसवणूक करून माझे लग्न एका नपुंसक व्यक्तीसोबत लावून दिले. 
हुंडा, सोन्याचे दागिने व लग्नातील सर्व सामान यांनी फसवणूक करुन घेतले होते. मी एक स्त्री आहे आणि माझा विचार आपण करायला पाहिजे. माझे भविष्य हे अंधारात आहे. त्यामुळे आपण ..... या चारही व्यक्तींवर फसवणूक, मारहाण व माझे सासरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा तात्काळ दाखल करून या चारही आरोपींना अटक करण्यात यावी ही विनंती. अन्यथा मी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या मदतीने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बॅनर, पोस्टर व पॅम्प्लेट बनवून आंदोलन हाती घेईल याची गंभीर दखल आपण घ्यावी.
अशा प्रकारची ही तक्रार असून त्यामुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. आता याबाबात पोलीस कारवाई करतात की नाही, हे लवकरच कळणार आहे. पोलिसांनी दखल न घेतल्यास, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या मदतीने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बॅनर, पोस्टर व पॅम्प्लेट बनवून संबंधित पत्नी आंदोलन करते की काय? आणि तसे झाल्यास पती काय करेल याबाबात चविष्ट चर्चा रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या