आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यक्षपदी रूपेश सरोदे

वसमत: आझाद समाज पार्टीच्या वसमत तालुकाध्यपदी रूपेश सरोदे यांची आज दि. १७ जुलै २०२१ रोजी एकमताने निवड करण्यात आली. वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला वसमत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आझाद समाज पार्टीचे नुतन प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर यांचा आझाद समाज पार्टी जिल्हा हिंगोली तर्फे सत्कार करण्यात आला. सदरील बैठकीमध्ये आझाद समाज पार्टी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. याबैठकीमध्ये वसमत तालुका अध्यक्ष म्हणून रुपेश सरोदे यांची एकमताने निवड करण्यात आली. रुपेश सरोदे हे युवा पँथर या सामाजिक संघटनेचे जिल्हा प्रमुख होते. वसमत तालुक्यात त्यांचे फार मोठे तरुणांचे संघटन आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. अभिजित खंदारे, युवा नेते निशांत राऊत, नूतन तालुका अध्यक्ष वसमत रुपेश सरोदे, प्रवीण सूर्यवंशी, वसमत तालुका कार्यकारणी उपस्थित होती. यावेळी दि. ३० जुलै रोजी हिंगोली येथे होणाऱ्या आझाद समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याबाबत चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या