कैद्यांनो आहाराची चिंता करू नका, आता कारागृहात तुम्हाला मिळेल पुरणपोळी, फळांचा रस, श्रीखंड पुरी आणि बरेच काही

पुण्यातील येरवडा, हिंगोली, गोंदिया आणि या पालघर या नवीन जिल्ह्यामध्ये कारागृह बांधण्याचा प्रस्ताव Prison Welfare in Maharashtra State

मुंबई: मानवी हक्क कायदे आणि न्यायालयांचा कैद्यांबाबत उदार दृष्टिकोन यामुळे आता कारागृहातील कैद्यांना पुरणपोळीसह विविध खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. राज्य कारागृह प्रशासनाने आता कैद्यांसाठीच्या उपाहारगृहातील आहारतालिका म्हणजेच मेन्यूमध्ये नवीन विविध खाद्यपदार्थ नव्याने दाखल केले आहेत. (Jail manual in maharashtra added some welfare schemes for prisoners) नव्या निर्णयानुसार आता कैद्यांना पुरणपोळी, श्रीखंड पुरी, मिठाई, फरसाण, पनीर, फळांचा रस असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. या निर्णयामुळे कैद्यांची आहाराची चिंता बरीचशी कमी होणार आहे. puran poli shrikhand fruit juice and other quality food will be served in prisons in maharashtra state.

राज्य शासनाकडून मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात फक्त ८०० कैदी ठेवण्याची क्षमता असताना दररोज कैदी वाढत असल्याने या कारागृहावर पडणारा ताण कमी करण्यासाठी राज्य कारागृह विभागाने मुंबईत चेंबूर येथे नवीन बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. (Maharashtra Government Prison Rules) राज्यातील वाढते गुन्हे आणि या गुन्ह्यांमध्ये पकडलेले आरोपी आणि दोषसिद्ध झालेल्या आरोपींमुळे राज्यभरातील कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे राज्यशासनाने हा निर्णय घेतला असून यासोबतच पुण्यातील येरवडा, हिंगोली, गोंदिया आणि पालघर या नवीन जिल्ह्यामध्ये कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला आहे. News Prison at Hingoli, Palghar, Gondia and Yerwada are proposed, additional police general of Prison Department Mr. Sunil Ramanand said.

याबाबत राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले की, अमेरिकेतील बहुमजली कारागृहांच्या धर्तीवर मुंबईत नवीन बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच यासाठी मुंबईतील चेंबूर परिसरात महिला बाल कल्याण विभागाची १५ एकर जागा यासाठी निवडण्यासाठी आहे. ही जागा कारागृह विभागाला देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली असल्याने आता या जागेवर भव्यदिव्य असे बहुमजली कारागृह उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Multi storied prison building to be built in Mumbai. 

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने