फौजदार गंगाधर बनसोडे यांचा आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने सत्कार

हिंगोली- शहरात कोरोनाकाळात अनेक बेधडक कारवाई करत नागरिकांना न्याय मिळवून दिला तसेच कोरोनाकाळात हिंगोली शहरात जनजागृती करत नागरिकांना मास्क वापर करावा, सामाजिक अंतर राखावे अशी जनजागृती केली. 
या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेत आंबेडकर प्रेस काॅन्सिलच्या वतीने हिंगोली शहरातील भट काॅलनी येथील आंबेडकर प्रेस काॅन्सिल कार्यालयात आंबेडकर प्रेस काॅन्सिलचे संस्थापक अध्यक्ष रावन धाबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास एम.के.एन जिल्हा प्रतिनिधी तथा मिडीया प्रमुख सुधाकर वाढवे, पत्रकार धोंडीराज पाठक, प्राध्यापक उत्तम बलखंडे, प्रेस फोटोग्राफर लक्ष्मीकांत पाठक यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या