पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून

वसमत /अनिल शितोळे: तालुक्यातील वापटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचा खून केल्याची घटना शनिवारी रोजी निदर्शनास आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील पाण्याच्या टाकी जवळ विकास बाबुराव शिंदे यांचा मृत्यूदेह आढळला. नंतर पोलीस तपासामध्ये असे आढळून आले की, त्यांचा खून त्याचा चुलत भाऊ अमोल शिंदे याने केला. अमोल शिंदे याच्याविरोधात कुरुंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोपीनवार हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याच्या चुलत भावाचा खून का केला? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मयताच्या अंगावर गंभीर जखमी असून त्याला मारहाण करून त्याचा खून केला असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कुरुंदा पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणी सध्या तरी तपास चालू असल्याचे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या