आझाद समाज पार्टीत कळमनुरी तालुक्यातील अनेकांचा प्रवेश

हिंगोली: आज दिनांक २७ जुलै रोजी हिंगोली येथील विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीत विविध पक्ष संघटनातील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी कळमनुरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत बलखंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट सचिन पट्टेबहादूर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख ॲड. रावण धाबे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत रुपूर ता कळमनुरी जि हिंगोली, गावचे उपसरपंच प्रशांत भाऊ बलखंडे यांच्या समर्थकासह आझाद समाज पार्टी जाहीर प्रवेश केला. तसेच वंचित बहुजन आघाडी आडगाव (मुटकुळे ) माजी शाखा प्रमुख सुखदेव हनवते, भारतीय बौध्द महासभेचे तालुका पदाधिकारी गणेश हनुवते यांनीही आझाद समाज पार्टीत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गौतम इंगोले, अमोल बलखंडे, ऍडव्होकेट अमोल अंभोरे पाटील, गंगाराम बलखंडे, अमोलबलखंडे, सिद्धार्थ बलखंडे तानोजी बलखंडे, विजय धाबे, किरण गायकवाड, राहूल बलखंडे, संतोष बलखंडे, पवन बलखंडे, मंगेश सपाटे, मंगेश इंगोले, विशाल बलखंडे, ऋषिकेश मोरे, विकास बलखंडे, शेख मुक्तार, अमोल वानखेडे, आकाश मोरे, इस्माईल बेग आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्व जाहीर प्रवेश केलेल्या मान्यवरा चा जाहीर सत्कार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट सचिन पट्टेबहादूर, जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट रावण धाबे यांच्या हस्ते झाला. 

या बैठकीमध्ये सर्वानुमते, कळमनुरी तालुका प्रमुख पदी, प्रशांत भाऊ बलखंडे, हिंगोली शहर अध्यक्षपदी शेख निसार, जिल्हा उपाध्यक्षपदी, अशोक भाऊ चक्रवती यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद नसीर यांनी तर आभार प्रदर्शन अशोक चक्रवर्ती यांनी केले. या कार्यक्रमांस भरपूर प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने