ठाणेदार रवी हुंडेकर तडकाफडकी निलंबित

अवैध धंद्यांवर कारवाईचा निष्काळजी पणा भोवला
हिंगोली/बिभीषण जोशी- बाळापूर ठाण्याच्या हद्दीत अवेध्य धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही राजरोसपणे अवेध्य धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वाढत गेल्या त्यामुळे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी बाळापूर ठाण्याचे ठाणेदार रवी हुंडेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित केल्याचे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले आहेत.या प्रकारामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक निस्सार तांबोळी यांनी हिंगोली जिल्ह्यात अवेध्य धंदे बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यानंतर देखील जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवेध्य धंद्यांचा सुळसुळाट पाहवयास मिळत होता. तसेच तक्रारीही वाढल्या होत्या. दरम्यान,२५ जुलै रोजी शेवाळा हद्दीत चार लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना अटक करण्यात आली. आयजी कडून विशेष मोहीम राबविल्या नंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे हद्दीत जुगार सुरू असल्याचे लजास्पद असून ,लाखापर्यंत रोख रक्कम मिळते .याशिवाय या जुगार खेळण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला जात आहे.ही बाब अतिशय घृणास्पद आहे. असे प्रकार सहन केल्या जाणार नाहीत. वर्तमान पत्रातून छापून येणाऱ्या बातम्या व अवेध्य धंद्यांच्या तक्रारी यावरून रवी हुंडेकर यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पस्ट दिसून येते. आपण बाळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या नात्याने बेजबाबदार व घोर निष्काळजीपणाचे गंभीर वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून सदर तारखेपासून शासकीय सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश काढले आहेत.

निलंबन काळात मुख्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षात राहण्याचे आदेश दिले असून, परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील पत्रात बजावले आहे. तसेच निलंबन काळात कोणतेही खाजगी व्यवसाय करता येणार नाही. खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करताना आढळून आल्यास आदेशाचे उल्लंघन केल्यास खात्यांतर्गत वेगळी कारवाई करण्याचा इशारा आयजीनी दिला आहे.निलंबन काळात मूळ वेतनाच्या १/२ एवढा उदरनिर्वाह भत्ता मिळेल. बाळापूर ठाणे प्रमाणे आयजीनी जिल्ह्यातील इतर ठाणे हद्दीतील तपासणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येतील . रवी हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित केल्यामुळे जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता आणखी किती ठाणेदाराचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या