हिंगोली: भिम आर्मी चिफ भाई चंद्रशेखर रावण यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध पदाधिकार्यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्यात प्रदेश उपाध्यक्षपदी हिंगोली-वाशिम जिल्ह्याचे प्रभारी अॅड. सचिन पट्टेबहादूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सचिन पट्टेबहादूर हे गेल्या अनेक वर्षांपासून भिम आर्मी या सामाजिक संघटनेत कार्यरत होते. आझाद समाज पक्षाची स्थापना झाल्यावर ते आझाद समाज पक्षात सक्रिय झाले. प्रदेशाध्यक्ष राहूल प्रधान यांनी त्यांच्याकडे हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. त्यातच आता त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आझाद समाज पार्टीच्या युवक प्रदेश महासचिवपदी अॅड. क्रांती सहाने, वकील आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी अॅड. तोहसीफ शेख यांची निवड करण्यात आली आहे.