आरोपी माचेवाडला अटकपूर्व जामीन मंजूर

लाचखोर अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची गरज...

बिभीषण जोशी
हिंगोली: रेती टिप्पर प्रकरणात तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेला आरोपी हिंगोली तहसीलदार माझे वाड्याला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर माचेवाड हा फरार झाला होता.

येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड याला ३ लाख लाचेच्या मागणीवरून गुरुवारी शहर पोलिसात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. २ दिवसानंतर शुक्रवारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी येथील न्यायालयात अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला असता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शिंदे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तहसीलदारला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रेतीचे टिप्पर लवकर सोडून देण्यासाठी व मागील टिप्परवर कारवाई करू नये यासाठी तहसीलदार माचेवाडने लाचेची मागणी तक्रादारकडे केली होती. 

विशेष बाब म्हणजे सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असतानाही ते लाच खावून आपले घर भरत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस विभागात असले प्रकार घडल्यास सदर कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक बडतर्फ करीत असतात. परंतु इतर अधिकाऱ्यांनी कर्मचारी लाचेवर लाच खाऊन, सर्व लाज विकून टाकत आहेत आणि बाहेर मोकाट करून शासकीय यंत्रणा पूर्णतः पोखरून टाकत आहेत. त्यामुळे प्रचंड सामाजिक रोष निर्माण होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने