सेनगाव तालुक्यातील खडकी येथे विज पडून ८ मेंढ्या दगावल्या

सेनगाव/शिवशंकर निरगुडे: सेनगाव तालुक्यातील खडकी येथे रात्रि 11 वाजता विज पडून 8 मेंढ्या दगावल्या आहेत हें मेंढपाळ यांचे नाव विजय सूगदेव बिजकूले रा .सहत्रमुळी तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा येथिल रहिवाशी आहेेत
गेल्या आठ महीन्यापासून मेंढ्या चारन्या साठी गावोगावी फिरत आहेत गेल्या दोन महीन्यापासून हें सेनगाव तालुक्यातील खडकी येथे माळरानावर त्यांनी मेंढ्या थांबवल्या आहेत मात्र दि 26 /07/2021 ला वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाट सह मुसळधार पाऊस पडला आणि रात्रि 11 वाजता विज पडून याच्या तब्बल 8 मेंढ्या विज पडून दगावल्या आहेत या आठ हि मेंढ्याच्या पोटात त्याची पिल्ले देखिल होती या मेंढ पाळाचे अंदाजे 150 लाख रुपयाचे नुकसान जालें आहे अशी माहिती खडकी येथिल सरपंच एकनाथ हराळ यांनी दिली आहे अद्यापही कोणताही पंचनामा करण्यात आला नाही खडकी येथिल तलाठी यांना फ़ोन करून हि माहिती देण्यात आली आहे तरी प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामा करून या मेंढपाळ यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी हें मेंढपाळ विजय सूगदेव बीजकुले हें करिता आहेत

सेनगाव तालुक्यातील कापडशिंगि परिसरात देखिल मुसळधार पाऊस पडल्या मुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने शेतात पेरणी केलेले सोयाबीन कपाशी खरडुण गेले आहेत कापडशिंगि येथिल नदीला देखिल मोठ्या प्रमाणात पूर आला होता या मुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहेत त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या