हिंगोली शहरात एकास चाकूने मारहाण

हिंगोली: शहरातील कृष्णा टॉकीज परिसरात एकास विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 18 जून रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
फिर्यादी तानाजी रामकिशन बांगर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी शहरातील कृष्णा टाकीज परिसरात आले असता यावेळी आरोपींनी संगणमत करून त्यांना शिवीगाळ करत दगडाने तसेच चाकूने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तानाजी बांगर यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या