डीपी सुरू करण्यावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

गिरगाव येथील घटना : मारहाण करणाऱ्यास अटक

हिंगोली: डीपी का सुरू करत नाहीस असा जाब विचारत गिरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील कार्यालयात येवून कर्तव्यावर उपस्थित असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल सुभाषराव आवकाळे यास बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि.21) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण करणारे वीजग्राहक बाळू पाटील कर्हाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक ही करण्यात आली आहे..

सोमवारी (दि.21) रात्री वडगाव रोड गिरगाव येथील फेसकाई डीपी (रोहीत्र) बंद झाल्याने रात्री सात वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता. वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल आवकाळे व त्यंचे बाह्यस्त्रोत सहकारी रामेश्वर गुंडले यांनी तात्काळ रोहीत्र दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला परंतू रोहीत्र तत्काळ दुरूस्त होवू शकले नाही. वीजपुरवठा बंदच राहिल्याने बाळू पाटील कर्हाळे या वीजग्राहकांने डीपी का सुरू केली नाही असे म्हणत वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल आवकाळे यांना गिरगाव उपकेंद्र येथे कर्तव्यावर असताना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच उपकेंद्रातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱी गुंडले यासही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करत शासकीय कामात दहशत निर्माण करून अडथळा निर्माण केला.

झाल्या प्रकाराबाबत दि.22 जूनला वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल आवकाळे यांच्या फिर्यादी वरून कुरूंदा पोलीस ठाण्यात बाळू पाटील कर्हाळे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी याची गंभीर दखल घेत बाळू पाटील कर्हाळे यास तत्काळ अटक केली आहे. मारहाण करणाऱ्यास लागलीच अटक करण्यात आल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने