धनगर आरक्षणासाठी सामुदायिक लढ्याची गरज: वैजनाथ पावडे

हिंगोली: धनगर आणि धनगड फरक पुढे करून धनगर समाजाला घटनेने देऊ केलेले आरक्षण ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला ते कुठल्या कुठे जाऊन पोहोचले मात्र धनगर समाजाचे आरक्षण नाकारल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला आहे, असे मत धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केले.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये महाआघाडीने धनगर समाजाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाज आरक्षण देवू असे म्हटले होते. पण आज पर्यंत कुठल्या ही राजकीय पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार केलेला नाही. म्हणून माझी सर्व धनगर समाजातील नेतेमंडळी ला विनंती आहे की आपण सर्व आपसातील भेद विसरून एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे. धनगर समाजावर खूप मोठे अन्याय होत आहेत पण नेतेमंडळी वेग-वेगळ्या पक्षांमध्ये असल्यामुळे धनगर समाजातील मेंष पालक वर्ग हा मेंढपाळ आहेत त्यांना खूप मोठा त्रास होत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन जून-जुलैमध्ये आपल्या मेंढपाळ बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या मोकळ्या व गायरान वन विभाग आहेत. त्या त्या ठिकाणी मेंढपाळांना मेंढ्या चारण्याची परवानगी मिळाली पाहिजे व मेंढपाळाच्या मुलाच्या शिक्षणासाठी या राज्यांमध्ये तालुका वाईज शिक्षणासाठी वस्तीग्रह या सरकारने पेशल मेंढपाळांच्या मुलांसाठी करून देण्यात यावे.

कारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत या राज्यातला मेंढपाळ रानावनात जंगलामध्ये पहाडी मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या मेंढ्यांना चारा मिळते त्या त्या ठिकाणी आपल्या मेंढ्या साह रात्री सुद्धा त्या जंगलामध्ये एका कापडाचे पाल तयार करून त्याच्या भागांमध्ये मेंढपाळ रहात असतो. म्हणून त्याच्या मुलाला मुलीला शिक्षणासाठी या राज्यांमध्ये तालुका वाईज वस्तीग्रह व त्यांच्या अभ्यास क्रमांकाची सुविधा ही करून देण्यात यावी यासाठी आपण सर्व जण एकत्र यावे, असे आवाहन धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments