जातचोर खासदार नवनीत राणा गेल्या सर्वोच्च न्यायालयात

हायकोर्टाच्या  निर्णयाविरोधात धाव, खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांचा आटापीटा

अनुसूचित जातींच्या हक्काची अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा पैसा, प्रसिद्धी आणि ताकदीच्या बळावर मिळवून खासदार झालेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बॉम्बे हायकोर्टाने रद्द केल्यानंतर आता राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करून आपली खासदारकी वाचविण्यासाठी आटापीटा सुरू केला आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयामूळे खर्‍या अर्थाने जातचोर खासदार ठरलेल्या नवनीत राणा यांनी आता स्वत: राजीनामा देण्याची मागणी होत आहे.

बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत जन्म झालेल्या नवनीत राणाने तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा मॉडेलिंग करायची. मात्र 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि राजकारणात आपले करीअर आजमावणे सुरु केले. लग्न झाले त्यावेळी नवनीत राणा या महिलेचे पती रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतू या निवडणुकीत त्यांना चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेल्या शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून सपाटून मार खावा लागला. आपणही अनुसूचित जातीचे आहोत, मागास आहोत असे सांगून त्यांनी मतदाराना भावनिक केले आणि 2019 च्या निवडणुकीत  पैसा, प्रसिद्धी आणि मणूष्य ताकदीच्या बळावर जागा आपल्या पदरात पाडून घेतली. परंतू, मतदाराना फसवून बळकावलेले खासदारकीचे पद आता धोक्यात आले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने