शेतात आल्याच्या कारणावरून पती व पत्नीस मारहाण

अंबाळा तांडा येथील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल


हिंगोली: अंबाळा तांडा शेत शिवारातील गायरान जमिनीवर आरोपींनी संगणमत करून आम्ही मक्त्यानी केलेल्या शेतात का आले असे म्हणून पती व पत्नीस जबर मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात 18 जून रोजी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील लक्ष्मण पीराजी मासुळकर यांना व त्यांच्या पत्नीस आरोपींनी मारहाण केली आहे. आम्ही मक्त्यानी केलेल्या शेतात का आले या कारणावरून आरोपींनी वाद घालत लक्ष्मण मासुळकर यांचे दगडाने डोके फोडले, यावेळी त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी लक्ष्मण मासुळकर यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या