३ लाखाची लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल

हिंगोली: ३ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी हिंगोलीच्या तहसीलदार आवर गुन्हा दाखल झाला आहे. पकडलेले रेतीचे टीप्पर सोडून देण्यासाठी आणि अगोदर पकडण्यात आलेल्या टीप्परवर कारवाई न करण्यासाठी गलेलठ्ठ पगार असलेल्या या लोकसेवकावर ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पांडुरंग माचेवाड असे या तहसीलदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तकारदार यांनी दिनांक २५.०५.२०२१ रोजी तक्रार दिली होती की, त्यांनी भाड्याने घेतलेले पाच टिप्पर मागील विस पंचविस दिवसापूर्वी रेतीची वाहतुक करीत असतांना हिंगोली पोलीसांनी पकडुन पोलीस स्टेशनला लावुन मा तहसिलदार, हिंगोली यांना पत्रक देवुन पुढील कार्यवाही करणे बाबत कळविले होते. त्यावरून तक्रारदार मा.तहसिलदार हिंगोली यांना जाबुन भेटले असता रेतीच्या पकडलेल्या पाच हि टिप्परची लवकर कार्यवाही करून लवकर सोडण्यासाठी व मागील महिन्याचे रेतीचे टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेले पैसे असे मिळुन ३,००,०००/- रू लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती.

त्यावरून दिनांक २५.०५.२०२१ रोजी तक्रारदार यांचे तकारीची पडताळणी करण्यात आली असता लोकसेवक माचेवाड, तहसिलदार, तहसिल कार्यालय हिंगोली यांनी तक्रारदार यांना ३,००,०००/- रू. ची लाच स्विकारण्याची सहमती दिली.

लोकसेवक माचेवाड तहसिलदार तहसिल कार्यालय हिंगोली यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर गुरन 152/२०२१ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.

ही कामगिरी मा. श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षिक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री निलेश सुरडकर, पोहेका श्री विजय उपरे, पोना श्री तान्हाजी मुंढे, पोना श्री विनोद देशमुख, पोना श्री ज्ञानेश्वर पंचलिंगे, पोशि श्री अविनाश किर्तनकार, पोशि प्रमोद थोरात चापोना श्री सरनाईक अॅक ब्युरो कार्यालय हिंगोली यांचे मदतीने यशस्वीपणे केलेली आहे.

Post a Comment

0 Comments