ब्रेकिंग न्यूज: नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

हिंगोली पोलीसांकडून राष्ट्रिय पातळीवरील गुन्हा उघडकीस....

हिंगोली: संपूर्ण भारतातील सुशिक्षीत बेकार मुलांना नौकरीचे अमिश दाखवुन करोडो रुपये लुबाडनार्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली, लखनउ येथुन अटक करण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा, व पो.स्टे. वसमत शहर यांनी संयुक्तपणे केली असुन या कारवाईमुळे हिंगोली पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३/०५/२०२१ रोजी फिर्यादीने पोस्टे वसमत शहर येथे फिर्याद दिली की, संतोष पिता बनवारीलाल सरोज रा. बोडेपुर ता. मच्छली जि. जोनपुर उतरप्रदेश याने २०१८ साली फिर्यादीला रेल्वे मध्ये शासकिय नौकरी लावुन देतो म्हणून वेळोवेळी विविध बँक खात्यामार्फत व नगदी असे एकुण १०,००,०००/ (दहा लाख रूपये) घेवुन अद्याप पावेतो नौकरी न लावता फिर्यादीची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पोस्टे वसमत शहर येथे गुरंन १५३ / २०२१ कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच फिर्यादीने त्याच्या सारख्या अनेक मुलांची फसवणुक करून आरोपीने करोडो रूपयाची फसवुणक केल्याचे सांगीतल्याने गुन्हयाची व्याप्ती खुप मोठी असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत होते. त्यावरून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांनी सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख यांचे मार्फतीने गुन्हयाच्या तपासावर विशेष लक्ष देवून तपासासंबंधाने दोन पथक तयार केले. त्यात स्थानिक गुन्हे शाखाचे पोउपनि श्री शिवसांब घेवारे, पोशि/ किशोर कातकडे, विठठल काळे, जयप्रकाश झाडे व पोस्टे वसमत शहरचे सपोनि बोधनापोड, पोना/ संदीप चव्हाण, रवि ठेबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांचा समावेश होता.
पोलिसांचे आवाहन...

सदर गुन्हयाची व्याप्ती ही पुर्ण भारतभर असुन वरील आरोपीकडुन कोणाची फसवणुक झाल्यास पोस्टे वसमत शहर किंवा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे संपर्क करण्याचे अवाहन पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी केले आहे.
पोलीस पथकाने सदर गुन्हयातील आरोपी शोधण्यासाठी दिनांक ०९/०६/२०२१ रोजी रेल्वे स्टेशन परिसर नांदेड येथे सापळा रचुन गुन्हयातील आरोपी नामे १ रविंद्र उर्फ रविंद्र दयानिधी संकुवा वय ४६ वर्ष रा. ओडीसा ह. मु काटेमान्नीवली ता कल्याण जि. ठाणे, २. ॲड. नरेंद्र विष्णदेव प्रसाद वय ५५ वर्ष रा. लयरोपरूवार ता. कोपागंज जि. मडु, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी अनेक मुलांची फसवणुक केल्याची कबुली देवुन त्यांचे इतर साथीदार नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनउ या ठिकाणी असल्याचे सांगुन संपुर्ण भारतामध्ये शेकडो मुलांचे करोडो रूपये घेवुन बनावट नियुक्ती पत्र देवुन फसवणुक केल्याची कबुली दिली.

त्यावरून पोलीस पथकांनी सायबर सेलच्या तात्रीक विशलेषानावरून दिनांक ११/०६/२०२१ रोजी नांदेड शहरात सापळा रचुन आरोपी क्रमांक ३. सतिश तुळशीराम हंकारे वय २६ वर्ष रा. बोरगाव ता.लोहा जि. नांदेड, ह. मु अहमदपुर व नांदेड ४. आनंद पांडुरंग काबळे वय २४ वर्ष रा. अहमदपुर जि. लातुर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपींनी सांगीतले की, नांदेड येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे अॅकॅडमी चालवुन सुशिक्षत बेरोजगार मुले हेरून फसवणुक करत असल्याचे सांगुन इतर आरोपींची नावे सांगीतली.
आरोपींच्या सांगण्याप्रमाणे दिनांक १३/०६/२०२१ रोजी मुंबई येथे पोहचले. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक ५. गौतम एकनाथ फणसे वय ५६ वर्ष रा. वाघनी ता. अंबरनाथ जि. ठाणे मुंबई यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता मुंबई व परिसरातील अनेक मुलांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर तपास पथकाने दिल्ली येथे रवाना होवुन आरोपी क्रमांक ६. अभय मेघशाम रेडकर उर्फ राने वय ४८ वर्ष रा. मोतीनगर न्यु दिल्ली मुळ पत्ता शिरोडा ता. वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग यास मोतीनगर न्यु दिल्ली येथे सापाळ रचुन ताब्यात घेतले व त्याच्या सांगण्याप्रमाणे गुन्हयातील मुख्य आरोपी क्रमांक ७. संतोष कुमार सरोज पिता बनवारीलाल सरोज वय २९ वर्ष रा. बोडेपुर ता. मच्छली जि. जौनपुर उतरप्रदेश यांस पकडण्यासाठी पथक उतरप्रदेश येथे गेले असता सदर आरोपी मुळ गाव सोडुन लखनउ येथे लपुन राहत असल्याचे समजले. त्यावरून संतोष कुमार सरोज यास सापळा रचुन लखनउ, उतरप्रदेश येथील लॉजमधुन ताब्यात घेतले आहे. त्याची व राहण्याचे ठिाकणाची झडती घेतली असता विविध मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकारी यांचे बनावट स्टॅम्प, रेल्वे अधिकारी यांचे नावाचे बनावट नियुक्ती पत्र भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार असे नाव असलेले लिफाफे तसेच बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यासाठी लागणारा कागद, लॅपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र, अनेक मुलांचे बनावट नियुक्ती पत्र, अनेक एटीएम कार्ड, मोबाईल, सदर आरोपीतांच्या खात्यावर झालेले बँक व्यवहारचे डिटेल्स असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्हयामध्ये आता पर्यंत आरोपीतांनी वापरलेली १८ बँक खाते हॉल्ड करण्यात आले असुन त्याचे खात्यावरील ११,००,०००/- (आकरा लक्ष रूपये) सिझ करण्यात आले आहे. तसेच आरोपीतांकडुन नगदी ५६,०००/- रूपये व एक कार अंदोज किंमत ८,००,०००/- रू सात मोबाईल किंमत ५०,०००/- रू असा एकुण २०,०६,०००/- (विस लाख सहा हजार रूपये ) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयाची व्याप्ती पुर्ण भारत भर असल्यामुळे अनेक आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. सदरची फसवणुक ही वरील आरोपी व त्यांचे ईतर साथीदार मिळुण मागील १० वर्षापासून महाराष्ट्र, ओडीसा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यासह इतर अनेक राज्यातील बेरोजगार मुलांची फसवणुक केली आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, मा. श्री एम. राकेश कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री यशवंत काळे अप्पर पालीस अधीक्षक हिंगोली, श्री यतिष देशमुख सहायक पोलीस अधीक्षक, पोनि/ उदय खंडेराय, स्थागुशा हिंगोली, पोनि/ शिवाजी गुरमे वसमत शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / पंढरीनाथ बोधनापोड, वसमत शहर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवसांब घेवारे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, वामन पवार, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, संदीप चव्हाण, रवि टेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांनी केली. सदर कार्यवाहीचे मा. श्री निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या