सेनगाव येथे कार खड्ड्यात पडून चौघांचा मृत्यू: मयत विदर्भातील लोणार तालुक्याचे

सेनगाव/बबन सुतार: सेनगाव येथे काल नांदेड येथून आपल्या मुलीची भेट घेऊन परत गावाकडे विदर्भातील लोणार तालुक्यातील एका शिक्षकासह तीन शेतकरी बांधव परत जात असताना येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाजवळील खड्ड्यात कार कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि. १३ जून रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी घडली.
नातेवाईकाच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून सेनगाव तालुक्यात राज्य महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे गेली अनेक वर्षापासून सेनगाव ते येलदरी या महामार्गाचे काम चालू असून सदर काम कल्याण टोल कंपनीच्या गुत्तेदार अंतर्गत चालू असून अतिशय कासव गतीने काम चालू असून कामावर कुठे दिशादर्शक किंवा सूचनाफलक न लावता सदर रस्ता निर्मितीचे काम चालू असून रात्री-अपरात्री बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्या प्रवाशांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर काहींना अखेर आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना दि १३ जून रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास विदर्भातील लोणार तालुका जिल्हा बुलढाणा येथील एक शिक्षक व तीन शेतकरी बांधव आपल्या नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटावयास गेले असता ते परत गावाकडे येत असताना गावालगतच असलेला नव्याने बांधीत असलेल्या पुलाजवळ स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी क्रमांक एम एच 28 ए झेड 1120 क्रमांक असलेली गाडी गवळी खड्ड्यात पडून चौघांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला. सदर खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते या मृतांमध्ये प्रकाश साहेबराव सोनवणे वय 43 वर्षे रा. वढव , गजानन अंकुश सानप वय 46 वर्षे रा. खळेगाव, त्र्यंबक सजाबराव थोरवे वय 40 वर्ष रा. पळसखेडा, विजय परसराम ठाकरे वय 45 वर्ष रा. धानोरा सर्व ता. लोणार जि. बुलढाणा येथील रहिवाशी असून त्यांची कार खड्ड्यात पडल्याने ते जागेवरच गतप्राण झाले आहेत. 

सदर चौघांच्या मृत्यूस कल्याण टोल गुत्तेदार आसह संबंधित कंपनीचे अधिकारी असल्याची फिर्याद एकनाथ ज्ञानेश्वर सोनुने वय 32 वर्षे राहणार वढव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून कल्याण टोल गुत्तेदारसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध सेनगाव पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कलम 304 (अ) भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला असून घटनास्थळी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे सेनगाव ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षाताई लोकडे पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांनी भेट देऊन संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या