हिंगोली: जिल्ह्यात गेल्या दहा पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस झालेला नसताना सुद्धा कयाधू नदीला आज सकाळपासून मोठा पूर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर येण्यासाठी पात्राच्याक्षेत्रामध्ये किमान चार-पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीला पूर येत असतो परंतु कयाधू नदीला मात्र अचानक पूर आल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
आज आलेला पूर नदीपात्राची दोन्ही काठ काठ भरुन जात असल्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर ठरला आहे. सेनगाव आणि हिंगोली तालुक्यात सर्व साधारण पाऊस झालेला असतानाही हा पूर आला आहे हे विशेष.