घाबरण्याचे कारण मात्र नाही.....
कोरोना आजार रोखण्यासाठी देण्यात येत असलेल्या लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणार्या आरईएफआय या सरकारी समितीने लसीकरणानंतर अॅनाफिलेक्सिसमुळे (anaphylaxis) एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले आहे. जीव वाचविण्यासाठी देण्यात येणारी ही लसच जीव सुद्धा घेवू शकते हे सिद्ध झाले आहे. असे असले तरी घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरईएफआय पॅनेलद्वारे कोवीड लसीकरणानंतर एईएफआय (Adverse Events Following Immunisation ) प्रकरणानंतर झालेल्या गंभीर प्रतिकूल घटनांच्या कारणांचे मूल्यांकन केले गेले. नॅशनल एईएफआय कमिटीच्या अहवालानुसार, मार्च २०२१ रोजी लसीकरणानंतर अॅनाफिलेक्सिसमुळे 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अॅनाफिलेक्सिसमुळे कोव्हीड -19 लसीकरणामूळे झालेला हा पहिला मृत्यू आहे असे डॉ. एन. के. राष्ट्रीय एईएफआय समितीचे अध्यक्ष अरोरा यांनी पीटीआय या वृत्त संस्थेला सांगितले.
असे असले तरी या पॅनेलने म्हटले आहे, की लसीकरणाचे फायदे हाणीपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. अत्यंत सावधगिरीचा उपाय म्हणून हाणीचे सर्व संकेत शोधून काढले जातात. ही एक सामान्य बाब असल्याचे सुद्धा स्पष्ट करण्यात आले असून नागरीकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.