पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी

वसमत/अनिल शितोळे: वसमत तालुक्यातील शिरळी या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र रोग तपासणी करण्यात आली.
या तपासणीसाठी पांगरा सर्कलमधील शिरली , पांगरा, वापटी, कुपटी, राजवाडी येथील रुग्णांनी तपासणी करून घेतली. तपासणी. डॉ ओम पाटील सुर्यवंशी यांनी केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजय मुंदडा हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्कलमधील सर्व शिवसैनिकांनी योगदान दिले. यामध्ये युवा तालुकाप्रमुख विजय भाऊ शिंदे, सर्कल प्रमुख बजरंग जांबुतकर, भारत नलगे, श्याम आखरे, भीमराव शितोळे हे उपस्थित होते.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने