फसवेगिरी: नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द....

अमरावती: बोगस जात प्रमाणपत्र तयार करुन खासदारकी मिळविणाऱ्या नवनीत कौर यांची आता लोकसभेतून हकालपट्टी होण्याची अशा तमाम जनतेला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र आज हायकोर्टाने रद्द करुन २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नवनीत राणा कौर यांनी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र काढून गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकी मिळविण्यात यश आले. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. परंतु जात प्रमाणपत्र बनावट असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविले नसल्याने त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. परंतु तक्रारदारांनी त्यांचा पिच्छा काही सोडला नव्हता त्यानंतर आता त्यांना हा मोठा दणका बसला आहे.

न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. अडसूळांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला. अनुसूचित जाती जमाती च्या जागा ओळखणाऱ्या अशा या झेंडा ना दणका बसल्यामुळे मागास वर्गीय समाजात समाधान व्यक्त होत आहे सर्व अनुसूचित जातीची आणि मतदारांची सुद्धा नवनीत राणा कौर यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांना आता फसवणुकीच्या गुन्ह्यात सुद्धा शिक्षा होऊन जेलची हवा खाऊ घालण्याची गरज निर्माण होत आहे असे झाले तर भविष्यात अनुसूचित जाती जमातीच्या जागांवर पैसा आणि मनुष्यबळ आधार वर डोळा ठेवून त्या काबीज करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणीही करणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या