बौद्ध समाजावरील अन्याय-अत्याचार थांबवा: सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे भीम आर्मीची मागणी

वसमत: फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दिवसेंदिवस जातीय मनसीकतेतून होणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होत आहे. महविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत ह्यास पायबंद बसेल अशी आशा होती परंतु आमची आशा फोल ठरताना दिसत आहे.
महाविकास आघाडी मध्ये सुध्दा आम्ही सुरक्षित नाहीत अशी आमची पक्की धारणा निर्माण झाली असून ही भावना निर्माण होण्यास राज्यात घडणाऱ्या मागासर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना कारणीभूत आहेत.आज देखील माणुसकीला काळीमा फासणारी, महाराष्ट्रात प्रत्येक संवेनशील मनाला शरमेने मान खाली घालायला लावायला भाग पाडणाऱ्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहेत.

दिवसाढवळ्या ह्या राज्यात मागासवर्गीय समाजाच्या महिलांना मुलांना ज्येष्ठांना जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून , सूड भावनेनं टार्गेट केल्या जात आहे. समाजावर सामूहीक हल्ले केल्या जात आहेत, पीडित कुटुंब फिर्याद देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्यास हवे तसे सहकार्य मिळत नाही, घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केल्या जात नाहीत, उलट राजकीय दबाव तंत्राला बळी पडून पीडित कुटुंबावर दबाव तंत्राचा उपयोग करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्या जात आहेत. ह्या निर्ढावलेल्या नीच मानसिकतेच्या अपराध्यांना अभय कोणाचे..? देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षाच्या कालावधी नंतरही पुरोगामी महाराष्ट्रात जातीय हिंसाचारातून विविध घटनांतून बौद्धांचा नाहक बळी दिल्या जात आहे या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव काय असु शकते. दिवसेंदिवस राज्यांतील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे ह्याला जबाबदार कोण कळायला मार्ग नाही..? एकीकडे कोरोना महामारिमुळे मागील 15 महिन्यापासून लोकांच्या हाताला काम नाहीत परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा होत चालला असून भुकमरिने जिवाला मुकण्याची वेळ आहे तर दुसरीकडे जातीय अन्याय अत्याचाराणे बळी जात आहे आम्ही जगायचे तरी कसे..?

बौद्ध समाजावर जातीय द्वेषातून सामुहीक हल्ले करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी, पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, समाज कल्याण विभागाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य तात्काळ पीडितांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली त्यावेळी भीम आर्मीचे मराठवाडा सचिव तथा जिल्हा प्रमुख आनंद खरे, तालुका प्रमुख निवृत्ती ढेंबरे, महासचिव किशन खरे, मार्गदर्शक रवी कुंटे, सोशल मीडिया प्रमुख हर्षद आझादे उपस्थित होते

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने