निवडणुकांना लक्ष ठेवून संघटनात्मक कामे वाढवा: चंद्रशेखर रावण

हिंगोली: आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांच्या उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक 27 जून 2021 रोजी पार पडली. उदा बैठकीत त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांना समोर ठेवून संघटनात्मक कामे करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे येथे आयबी रेस्ट हाऊस येथे आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावण यांच्याशी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रावण धाबे यांनी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्यासह प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेवून लढण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच संघटनात्मक बांधणी आगामी निवडणुकांना समोर ठेवूनच करण्याचे त्यांनी सूचित केले. हिंगोली जिल्ह्यातून आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रावण धाबे, जिल्हा प्रभारी ॲड. सचिन पट्टेबहादूर यांच्यासह ॲड. अभिजीत खंदारे, अशोक चक्रवर्ती, नागेश अंभोरे उपस्थित होते. यावेळी हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी गतीने करून आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या