युवतीवर बलात्कार; गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव: आपल्याच समाजातील तरूण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीवर आज 27 मे रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

आजेगाव येथील वसीम खान मुस्तफा खान पठाण याने एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून अंदाजे तीन महिन्यापूर्वी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पीडित फिर्यादी युवती व नातेवाईकांना जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी वसीम खान मुस्तफा खान पठाण याच्याविरुद्ध कलम 376, 506 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments