लग्नाच्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरीशी घरोबा; गुन्हा दाखल

हिंगोली: पंचायत समिती सेनगाव येथील कर्मचाऱ्याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या 22 वर्षीय तरुणी सोबत गुपचूप लग्न केल्ल्याने हिंगोली ग्रामीण पोलीस सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अर्चना गव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून पती अनिल गव्हाणकर (आनंद नगर हिंगोली यांनी 22 वर्षे) तरुणी सोबत लग्न केल्याने हिंगोलीतील तरुणीसोबत दिनांक 7 मे 2021 रोजी लपून विवाह केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात आरोपी अनिल विश्वास गव्हाणकर, सुप्रिया राजूरकर, संजय राजूरकर, शोभा संजय राजूरकर, निलेश राजूरकर राहणार अंबिका टाकी रोड हिंगोली, मामा देवरत्न गव्हाणकर, मामी शोभा देवरत्न गव्हाणकर यांच्या विरोधात कलम 494/ 34 भादवि कलमानुसार हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यापूर्वी अनिल गव्हाणकर वर स्वतःच्या पत्नीला अंगावरून गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी पुसद हिंगोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या