ज्येष्ठ विधीज्ञ प्रल्हादराव उमरेकर यांचे निधन

हिंगोली: येथील ज्येष्ठ विधिज्ञ तथा हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करून शिवसैनिकांच्या मागे समर्थपणे उभे राहून जिल्ह्याला शिवसेनेचे आमदार, खासदार देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ॲड. प्रल्हादराव उमरेकर यांचे आज दिनांक २३ मे रविवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार यांचे जन्मगाव उमरा येथे आज केले जाणार आहेत.
हिंगोली येथे मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि गायत्री शक्ती पीठ स्थापन करण्यासाठी लाख-मोलाची जागा त्यांनी दिली तसेच अनेक धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी पुढे असायचे अशा सच्चा शिवसैनिक शिवसैनिकांची प्राणज्योत मालवली. अनेक वेळेस त्यांच्याकडे आमदार ,खासदार होण्याचे प्रस्ताव आले. परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पडद्यामागचा शिवसैनिक म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित ८० टक्के समाजकार्य आणि २० टक्के राजकारण केले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने