महावितरणची मान्सूनपुर्व कामे: वीजपुरवठा बंद काळात वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

बिभिषण जोशी
हिंगोली: पावसाळ्यामधे वीजग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करता यावा दृष्टिने दरवर्षी महावितरणच्या वतीने मान्सूनपुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटने, रोहीत्रांची देखभाल त्याचबरोबर उपकेंद्रामधील दुरूस्ती आदी कामांचा समावेश असतो. हिंगोली मंडळातील मान्सूनपुर्व कामांना आता वेग आला असून महावितरणचे कर्मचारी पुर्ण क्षमतेने देखभाल दुरूस्तीच्या कामास लागले आहेत. दरम्यान दुरूस्तीकरिता नाईलाजास्तव काही वेळासाठी वीजपुरवठा खंडीत करावा लागतो. या काळात वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व नागरिक घरी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. त्यामुळे कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सद्यस्थितीत महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी त्या-त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो, सर्व भागाचा वीज पुरवठा खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन इंसुलेटर तपासणे व बदलणे, रोहीत्रांची ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वीजवाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, वीजहवाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे. तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दुर करणे, अशा प्रकारची अनेक कामे केली जातात. मात्र सदर कामे करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित करावा लागतो.

कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून वीज वाहिनी तुटने, वीज तारांवरील डिस्क इंसुलेटर फुटने अशा घटना घडत असतात त्यामुळे महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कामे करावी लागतात. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव त्यामुळे घरी असलेले सर्वच नागरिक, वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून ग्राहकांनी वीजपुरवठा बंद असलेल्या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने