औंढा येथे पोलीस निरीक्षकाने केला हवेत गोळीबार

जमावाने केलेल्या दगडफेकीत फौजदार जखमी

हिंगोली: औंढानागनाथ पोलीस ठाण्यावर जमावाने दगडफेक केल्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला केल्याची घटना आज घडली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

औंढा पोलीस स्टेशनवर जमावान तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे , शंभर ते दीडशे नागरिकांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असताना जमावाने मुंडे यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्या वर प्राणघातक हल्ला केला या हल्यात वाघमारे हे जखमी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला , या नंतर हिंगोली पोलिसांची मोठी कुमक औंढा शहरात दाखल झाली असून, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी औंढा पोलीस स्थानकात तळ ठोकून आहेत, दरम्यान या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Post a Comment

0 Comments