हिंगोली जिल्ह्यात आढळले फक्त ६५ नवीन कोरोना रुग्ण

बिभीषण जोशीले
हिंगोली:- जिल्ह्यात मंगळवारी आयसोलेशन वॉर्ड येथील चार रुग्णाचा मृत्यू झाला, यामध्ये ४५ वर्ष पुरुष येहळेगाव ,३५ वर्ष पुरुष लोहरा औंढा,५५ वर्ष स्त्री केसापुर,७० वर्ष स्त्री साखरा या चार रुग्णाचा समावेश आहे. तर नव्याने ६५ रुग्ण आढळून आले आहेत. २६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.

आज प्राप्त झालेल्या अहवालात मंगलवारी आढळलेल्या रुग्णांत ३३ रुग्ण रँपीड टेस्ट तर ३२ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. २६२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यात एकुण तेरा हजार ४८६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी बारा हजार १०० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ११३७ रुग्णांवर उपचार चालु आहेत, २४९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर १२ , वसमत ३ , कळमनुरी परिसर ११ , सेनगाव ५ ,औंढा २ व्यक्ती आढळल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्टद्वारे सेनगाव ८ ,औंढा २४ असे एकुण ६५ रुग्ण आढळले आहेत.तर आज २६२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी ४२४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर ४५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज ४६९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या