सेनगाव तालुक्यात रेशन मालाचा काळाबाजार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

10 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त, आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

सेनगाव (बबन सुतार): तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून राशन मालाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा तहसील परिसरात ऐकावयास मिळत होती आज आखेर राशनचा मालाचा काळाबाजार करणाऱ्या दोघांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने सर्वसामान्य सह उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून गरीब व मजूरदार लोकांना मजुरीविना अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे या अनुषंगाने केंद्र सरकारकडून या कोरोना महामारीचा काळात कुठलेही कुटुंब उपाशीपोटी राहू नये यासाठी शासनाकडून योजनासह मोफत धान्यपुरवठा करण्याचा निर्णय करण्यात आला आहे या माध्यमातून शासनाकडून मोठ्या प्रमाणात धान्यपुरवठा केला जात आहे परंतु सेनगाव तालुक्यात गोरगरीब व लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सर्रास घडत असल्याचे आरोप नागरिकातून होत आहे. तालुक्यात गोरगरिबांचा योग्य वाटपा आभावि शिल्लक ठेवत असलेला राशनचा माल गेल्या अनेक वर्षापासून काळ्याबाजारात विक्री होत असल्याची चर्चा तहसील परिसरात होत असून आज दिनांक 26 मे रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी राज्य शासनाकडून कार्यालयात सुट्टी असून सुद्धा तहसील मधील धान्य गोडाऊन उघडून त्यातील गव्हाचे पोते गाडीमध्ये टाकून ते धान्य आरोपींनी बेकायदेशीररित्या शासनाकडून गोरगरीब लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात दिल्या जाणारा गहू हा आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी जास्त दराने चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सेनगाव हिंगोली रोडवरील तोषनीवाल महाविद्यालय जवळ आयशर कंपनी चे ज्याचा क्रमांक एम एच 46 ए आर 65 14 या वाहनासह मिळून आला.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मोकाटच

सेनगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून राशन चा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे या होत असलेल्या काळ्याबाजारात येथील शासकीय हुद्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्या कडूनच राशन च्या मालाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे काल काळ्याबाजारात धान्य विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून परंतु या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला मात्र मोकाटच असल्याची चर्चा होत आहे.

या गुन्ह्यातील आरोपी पंढरीनाथ घनघाव हा सेनगाव तहसील मधील गोदामात खाजगीरित्या काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे सदर आरोपी हा शासकिय नसून सुद्धा तो संपूर्ण धान्य वाटपासंबंधी चा व्यवहार पहात असल्याची चर्चा होत आहे काल सर्वत्र सुट्टीचा दिवस असल्याकारणाने यातील आरोपीने सुट्टीचा फायदा घेत राशनचा मालाचा काळाबाजार करताना रंगेहात पकडण्यात आले आरोपी पंढरीनाथ घनघाव याचा पाठीराखा कोण व राशन माफिया टोळी प्रमुख कोण याचा शोध घेण्याचे आवाहन सेनगाव पोलिसांसमोर उभे आहे खरंच राशींचा काळाबाजार करणाऱ्या मुख्य सूत्रधारास सेनगाव पोलीस अटक करतील काय हे मात्र सध्यातरी एक प्रश्न आहे.
या वाहनात 4 भरलेले पोती गहू व 2 पोती अर्धवट भरलेली असे एकूण 2 क्विंटल 50 किलो याची अंदाजे किंमत 6 हजार रुपये व एक तपकिरी रंगाचे आयशर कंपनी चा टेम्पो जाचा पासिंग क्रमांक एम एच 46 ए आर शेचाळीस 14 क्रमांकाचा टेम्पो सह असा एकूण 10 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फ्रीयादी पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास तुकाराम लगड वय 25 वर्षे व्यवसाय वाहन चालक व मालक रा तोंडगाव ता.जिल्हा. वाशिम पंढरीनाथ ग्‍यानबा घनगाव वय 34 वर्ष रा. सुरजखेडा ता. सेनगाव जी. हिंगोली यांच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात कलम 3/7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे मॅडम हा करीत असून सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना सेनगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज सेनगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments