पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, अन्यथा कठोर कारवाई

हिंगोली जिल्ह्यातील बँकांना खासदार हेमंत पाटील यांची बँकांना ताकीद

बिभीषण जोशी
हिंगोली: जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पिक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत कमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी ताकीद खासदार हेमंतभाऊ पाटील यांना बँक अधिकाऱ्यांना दिली.

आज दि. ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक कर्ज वाटप संदर्भात राष्ट्रीयकृत बँकाना येणाऱ्या अडचणी बाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत खा. हेमंत पाटील बोलत होते.

या बैठकीस हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी आढावा घेताना खा. हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी यासाठी बँकाना महत्वपूर्ण सूचना केल्या.

बँकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत तसेच शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करीत हे पुन्हा होऊ देऊ नका अशी स्पष्ट ताकीद दिली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा जास्तीत जास्त होण्यासाठी लाईन ऑफ अँक्शन ठरवून प्रत्येक बँकेने आठ दिवसांचे शेड्यूल येत्या दोन दिवसात द्यावे अशा सूचनाही केल्या.

बँकेकडे असलेल्या दत्तक गावांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रात प्रकाशित करावी जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळली जाईल, बँक प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करावी त्यामुळे बँकातील अनावश्यक गर्दी कमी होऊन शेतकर्यांच्या वेळेची व पैशाची बचत होईल.

खा. हेमंत पाटील हे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात नेहमीच अग्रेसर असतात. याच अनुषंगाने आजची ही महत्वपूर्ण आढावा बैठक होती.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने