मराठा समाजाच्या आरक्षणावरून चालू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप वाद-विवाद चालूच आहेत. या वादविवादात कुणी सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीला जबाबदार धरत आहे. तर कुणी मराठा आरक्षणाचा कायदा करणारे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरत आहे. अशाच वादात महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना चांगल्या कानपिचक्या दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झाला होता. परंतु आज सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकण्यासाठी जबाबदार धरत आहेत.
जे कुणीच करू शकले नाहीत, ते केवळ फडणवीस यांनी केले असल्याने, करणी सेनेचे प्रमुख सेंगर यांनी मराठा समाजाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पाय देऊन ते पाणी प्यावे आणि उपकारातून आपण कृतज्ञता मिळवावी असा उपरोधिक सल्ला दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेली टीका ते केवळ ब्राह्मण जातीचे असल्यामुळेच होत असल्याचेही शेंगर यांनी म्हटले आहे.