नांदेड: शहरातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पवन दिगांबर गिरी यांचे येथील जिल्हा रुग्णालयात दि. 20 मे रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 33 वर्षाचे होते.
अत्यंत शांत, हसतमुख असलेल्या पवन गिरी यांना आठवडाभरापुर्वी कोरोना लागन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सुरवातीला त्यांच्यावर आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तब्येत खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पवन गिरी यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु डॉक्टरांना यश आले नाही. दि. 20 रोजी रात्री 9 च्या सुमारास त्यांचे दु:खद निधन झाले. पत्रकार पवन गिरी यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे.
पवन गिरी यांच्या पार्थिवदेहावर सांगवी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मितभाषी व हसतमुखी असलेल्या पवन गिरी यांचे अकाली निधन झाल्याने मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या
We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe