काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि नेते राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत असून राजीव सातव हे अत्यंत मागास जिल्ह्यातून थेट राष्ट्रीयस्तरावरील नेते कसे झाले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्याचे उत्तरही राजीव सातव यांनीच देऊन ठेवले आहे.
![]() |
सत्यजीत तांबे यांनी राजीव सातव यांच्या सोबतचा ८ वर्षांपुर्वीचा शेअर केलेला जुना फोटो.... |
तर हे उत्तर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला लिहिलेल्या चिठ्ठीत दिले आहे. राजीव सातव यांनी कोणत्या सहकाऱ्याला चिठ्ठी लिहिली आणि त्याची मध्ये काय संदेश दिला, याबाबत काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी एक जुना फोटो आणि राजीव सातव यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी पोस्ट केली आहे. पोस्ट मधील मजकूर वाचल्यानंतर प्रत्येकाला राजू सातव हे एवढ्या उंचीपर्यंत कसे गेले, त्यांच्यामध्ये कोणती ऊर्जा होती आणि यशस्वी होण्यासाठी ते इतरांनाही काय संदेश देत होते, हे आपल्याला दिसून येईल. हि चिठ्ठी त्यांनी सध्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुलानी यांना लिहिली आहे. Youth Congress Leader Satyajee Tambe has shared a old letter (a note) hand written by the late congress leader Rajiv Satav in 2013 during a youth congress camp held at Kolhapur.
सत्यजित तांबे यांची पोस्ट खालील प्रमाणे आहेत....
एक आठवण२०१३ साली राज्यातील काही-
सातव यांनी दिलेला हाच तो संदेश...मोजक्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका शिबीरातील हा फोटो व त्याच शिबारात आमचा सहकारी कोल्हापूरच्या तौफिक मुलाणीला एक चिठ्ठी लिहून राजीवभाऊ सातवांनी दिलेले प्रोत्साहन!
"प्रिय तौफिक, प्रत्येक मनुष्यामध्ये एक शक्ती, ऊर्जा असते. त्या शक्तीचा उर्जेचा वापर आपण कसा करतो, त्यावर त्या माणसाचे भविष्य ठरते. आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचार कर.फार बाप माणूस होशील."
या संदेशामध्ये राजीव सातव यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा जागृत करून त्यानुसार मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी कोणत्याही देवदेवतांची पूजा करणे किंवा कर्मकांड करणे याबाबत न सांगता, अत्यंत वैज्ञानिक स्वरूपाचा हा सल्ला दिला होता. त्यावरून दिसून येते की राजीव सातव हे अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. The inspirational note written by Rajiv Satav himself goes viral after his death.