हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची बैठक संपन्न

सरपंचांनी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी एकजूट दाखवावी, मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे यांचे आवाहन

हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची आढावा बैठक हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आली.

या ग्राम संवाद सरपंच संघाचे मराठवाडा विभागीय किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी , दत्तराव लोंढे, ग्राभसंवाद सरपंच संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अतुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ग्राम संवाद सरपंचांच्या या बैठकीत हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नुतन पदाधिकारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

हिंगोली जिल्हा ग्राम संवाद सरपंच संघाची कार्यकारिणी खालील प्रमाणे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष खंदारे, जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन बेंगाळ, जिल्हा उपाध्यक्ष लखन शिंदे, तर जिल्हा सचिव अशोक इंगळे, जिल्हा संघटक पदी दत्तराव चव्हाण गुंडा, जिल्हा कोषाध्यक्ष पदी भुजंग सोंळके, जिल्हा सरचिटणीस पदी प्रवेश शृंगारे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी भूषण पाईकराव, आदींची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा अध्यक्ष अतुल घुगे यांनी केले, जिल्ह्यातून आलेल्या सर्व सरपंच यांना मराठवाडा विभागीय अध्यक्ष किरण घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तर आभार दत्तराव लोंढे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments