खासदार राजीव सातव यांची आरोग्य स्थिती झाली नाजूक: आरोग्य मंत्री राजेश टोपे

जाणून घ्या... सातव यांच्या शरीरात आढळून आलेला सायटोमॅजिलो व्हायरस आहे तरी काय?

मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला आहे. त्यामूळे त्यांची आरोग्यस्थिती नाजूक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. हा व्हायरस खतरनाक आणि नवीन प्रकारचा व्हायरस आहे. याबाबतीत राजीव सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी आपण संपर्कात असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले असून तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करित आहेत. (Congress MP Rajeev Satav suffer from Cytomegalovirus know full details).
राजीव सातव बरे होवोत हीच मंगल कामना.....

47 वर्षीय राज्यसभा खासदार राजिव शंकरराव सातव यांनी अत्यंत कमी वयात राष्ट्रीय राजकारणात उत्तूंग झेप घेतली आहे. राजकीय वारसा असला तरी थेट दिल्लीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून, राहूल गांधी यांच्या सारख्या देशाच्या अती महत्वाच्या नेत्याचा ‘राईट हॅण्ड’ होण्यासारखा वारसा निश्चितच त्यांना मिळालेला नाही. कोणताही राजकीय गॉडफादर नसताना, किंवा जात फॅक्टर अनुकूल नसतानाही, ते आज ज्या पदावर आहेत आणि त्यानी जो काही राजकीय गोतावळा दिल्लीत आणि देशभर निर्माण केला आहे, त्याचे सर्व त्यांनाच द्यावे लागेल. त्यामूळेच त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. त्यांच्या सारख्या नेत्यांची हिंगोली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशालाही भविष्यात गरज आहे. या आजारातून ते बरे होवोत अशी मंगल कामना आज प्रत्येक जण करीत असल्याचे दिसून येत आहे.
खासदार राजीव सातव हे गेल्या 15-20 दिवसांपासून कोरोनामूळे आजारी आहेत. पुणे येथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार चालु असून त्यांची प्रकृती मध्यंतरी सुधारली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले होते. परंतू त्यातच आता हा नविन विषाणू त्यांच्या शरीरात आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्याना वॅन्टीलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहीती आहे. (Rajiv Satav Latest News Update, Congress leader MP Rajiv Satav Health Condition, New Cytomegalovirus found in the body of Rajiv Satav)
सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात आणि त्यामूळे आगोदरच बिमार असणार्‍या रुग़्नासाठी हा व्हायरस अधिक धोका निर्माण करतो. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते. ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. ही सर्व साधारण लक्षणे असल्याने हा या आजाराचा रुग्ण शोधून काढणे अवघड आहे. गरोदर महिलांसह, लहान मुले याना सुद्धा हा आजार होत असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या