छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विद्यार्थी घडविण्याचा युवकांनी केला संकल्प

हिंगोली:  शहरातील गीतांजली पार्क येथे  गीतांजली पार्क , रामाकृष्णा रेसिडेन्सी ,सिताराम नगरी व रामनगर  या चार नगरातील युवकांनी गीतांजली पार्क येथील मोकळ्या जागेत छत्रपती राजे संभाजींची ३६४ वी वैचारिक जयंती कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत साधेपणाने साजरी केली .
          अध्यक्षस्थानी बळसोंड ग्रामपंचायतचे सरपंच , समाजसेवक पप्पू चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील, वकील रमेश शिंदे ,  शिक्षक माधव कोरडे , भानुदास लिंबूळे पाटील , पांडूरंग कोरडे पाटील , एएसआय शिंदे , डॉ . शिरिष वाढवे , संदीप काळे , जैस्वाल उपस्थित होते
      प्रथम मान्यवरांनी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले .

    याप्रसंगी संभाजी राजेंची सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची निती ,अनेक भाषेचे ज्ञान , वाचन , अभ्यास व ग्रंथ लेखन यास अनुसरून गीतांजली पार्कच्या मोकळ्या जागेत सर्व समाजातील नागरिकासाठी व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय व अभ्यासकेंद्र बनविण्याचा  येथील युवकांनी संकल्प सोडला .

      मुख्याध्यापक टी.एम. पोघे यांनी प्रास्ताविकातून महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करण्यामागील मीमांसा केली व युवकांच्या लोकोपयोगी कार्याची प्रशंसा केली .

    शिक्षक माधव कोरडे यांनी संभाजी राजेंच्या जीवनकार्यावर भाष्य केले. वयाच्या १४ व्या वर्षी बुध्दभूषण सह चार ग्रंथांचे लेखन केले , अनेक भाषांवर प्रभुत्व मिळविले , सर्व समाजाला समान न्याय दिला राजेंचा हा आदर्श विद्यार्थी व युवकांनी अनुसरावा असे आवाहन त्यांनी केले .

          मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक  अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील [अण्णा ]यांनी युवकांनी वाचनालय व अभ्यासिका बनविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून  मदत करण्याचे आश्वासन दिले .

         पप्पू चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून संभाजीराजेंच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकला . व वाचनालयास पाच आसन बाकडे व सिमेंट देण्याचे आश्वासन दिले . तसेच असे लोकोपयोगी कार्य केल्यास आपण सदैव मदतीस तत्पर राहू असे जाहीर केले .

        याप्रसंगी युवकांनी अतिथींचा समयोचित सत्कार केला. अमोल शेळके , सचिन तपासे सिध्दांत धुळे , प्रवीण जाधव , योगेश शर्मा अतूल शेळके , आशिष राऊत , सिध्दार्थ खिल्लारे ,सिद्धार्थ केशवे , साहेबराव कळंबे ,आनंद साळवे, प्रतिक हनवते , गजानन साळवे , सागर रोठे , जयकुमार इंगोले , सिध्दार्थ बगाटे , संतोष पवार यांनी जयंतीसाठी परिश्रम घेतले व उत्कृष्ठ आयोजन केले. प्रा.डॉ. कृष्णा इंगळे यांनी सुत्रसंचालन तर प्रा.पदमानंद सोनकांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या