अबब... माळधामणी येथे ५१ जणांच्या अँटीजन तपासणीत ११ पॉझिटिव्ह

बिभिषण जोशी
हिंगोली: तालुक्यातील माळधामणी येथे ५१ ग्रामस्थांची अँटीजन तपासणी केली असता यामध्ये अकरा जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड सेंटर येथे उपचारसाठी दाखल केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी गावपातळीवर अँटीजन चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे. दिलेल्या तारखेनुसार आरोग्य यंत्रणा गावात जाऊन तपासण्या करीत आहेत. गुरुवारी माळधामणी येथे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूची अँटिजन व आरटिपीसीआर टेस्ट करण्यात आली . एकूण ५१ जणांची चाचणी करण्यात आली त्यामध्ये ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले .व गावामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्यात आले . गावामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी १६७ जणांची चाचणी करण्यात आली.

मोहीम राबवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी समुदाय अधिकारी डॉ. वैशाली मुळे, डॉ. सुनील दिवसे ,श्री गायकवाड व श्री जायभाय , श्री घुले, श्री बनसोडे सेवक, माळधामणी ग्रामपंचायत येथील सरपंच लिलाबाई इंगळे, उपसरपंच शकुंतलाबाई उबाळे, ग्रामसेवक खंदारे, तलाठी कीर्ती मसारे, ग्रामपंचायत मधील संभाजी भोसले ,मारोतराव इंगळे , सर्व सदस्य, पोलिस पाटील कापसे, ग्रामपंचायत सेवक अशोक इंगोले , आशा स्वयंसेविका , रेखा सावंत , रोजगार सेवक भगवान शिंदे, आदींनी परिश्रम घेतले आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने