रुग्णसेवा करणारी ऍम्ब्युलन्स पेट्रोल टाकून फुकून देण्याची आमदार संतोष बांगर यांची धमकी

हिंगोली:- जिल्हा परिषद अध्यक्षांना उपचारासाठी औरंगाबाद येथे न्यायाचे असल्याने १०८ क्रमांकाची ऍम्ब्युलन्स वेळेवर मिळत नसल्याचे कारण पुढे करीत, कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी २० मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, अशी धमकी १०८ च्या संबंधित व्यवस्थापकाला दिली असल्याचा कथित प्रकार उघड झाला असून यामुळे लोकप्रतिनिधीच असे वागत असतील तर सामान्य माणसाने रुग्णसेवा करणाऱ्या १०८ क्रमांकाच्या या सर्व गाड्या खरेच जाळून टाकाव्यात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत आमदार बांगर यांच्या समर्थकांनी, आमदार कसे महान व्यक्ती आहेत, मायाळू सुद्धा आहेत आणि वेळेनुसार कणखर कसे आहेत याचे माहात्म्य सांगणारी संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.  

या क्लिपमध्ये काय संवाद आहे हे खालील संभाषणावरून दिसून येईल- खालील क्लिप ऐका आणि वाचा...
व्यवस्थापक : हॅलो

आमदार बांगर : हा साहेब

व्यवस्थापक : हा दादा, गाडी आता इथून निघाली फाळेगावहून… ती गाडी अर्ध्या-पाऊण तासात पोहोचेल बघा तिथे तुम्हाला.

आमदार बांगर : लय ओव्हर व्हायले बर मी, इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी 108 ची चालू देणार नाही…तुम्हाला टणटण सांगायलो,  मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन

व्यवस्थापक : दादा.. दादा..

आमदार बांगर : काय दादा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचंय आणि तुम्ही म्हणता की गाडी नाही. दोन घंटे बसून वाट पाहायलंय राजेहो... 

व्यवस्थापक : दादा बरोबर आहे, पण दोन गाड्या नांदेडला गेल्या. फाळेगावहून गाडी पाठवतो.

आमदार बांगर : अरे पण दोन तासापासून राहते का?

व्यवस्थापक : बरोबर आहे,पण... 

आमदार बांगर : मला मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला सांगतो २० मिनिटात गाडी पाहिजे तिथ, नाहीतर मी सांगतो तुम्हाला उद्यापासून… गाडी मी पेट्रोल टाकून फुकून देईन पाहा.

व्यवस्थापक : नाही दादा, काहीच प्रॉब्लेम नाही

आमदार बांगर : मला लवकरात लवकर गाडी पाहिजे. दोन तास झाले मी वेट बघायलो बघा तुमच्या गाड्यायची

व्यवस्थापक : मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय

आमदार संतोष बांगर : काय धंदा झाला का… दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हद्द झाली.

व्यवस्थापक : दादा मी .... 

आमदार बांगर :  अरे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे… त्याला संभाजीनगरला न्यायचं आहे. त्याची तब्येत बराबर नाही.. आणि तुम्ही असे करायले मग चुकीचं नाही का तुमचं.. 

व्यवस्थापक : दादा बरोबर आहे... 

आमदार बांगर : तुम्ही मला काही सांगू नका.. ताबडतोब २० मिनिटात गाडी आली पाहिजे तिथे… दोन घंट्यापासून फाळेगावहून गाडी येती?

व्यवस्थापक : दादा आली आहे गाडी आता तिथं

आमदार बांगर : लवकरात लवकर गाडी जाऊ द्या तिथं,  बाकीची कामं सोडा आणि ती कामं करा आधी

व्यवस्थापक : हो, हो दादा, गाडी पाठवतो..

एखाद्या सामान्य व्यक्तीने संबंधित ऍम्ब्युलन्स कंपनीच्या व्यवस्थापकाला अशी धमकी दिली किंवा त्याला अरेरावीच्या भाषेत बोलले तर संबंधित सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहत नाही या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष आमदार संतोष बांगर यांनी ॲम्बुलन्स पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिल्याने बांगर यांच्यावर गुन्हा दाखल होतो की नाही किंवा सत्य बाहेर येण्यासाठी सदर प्रकरणाची चौकशी होती की नाही? असा प्रश्न हिंगोली करांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने