लोकर्पण सोहळा थाटात, सोशल मिडीयावर हजारो जणानी केले लाईक...
हिंगोली:- एमजीएम अर्थात महात्मा गांधी मिशन या शिक्षण संस्थेच्या एमजीएम विद्यापीठाच्या गिताचा (MGM University Official Anthem) लोकर्पण सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला असून प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमुर्ती यानी हे गित स्वरबद्ध केले असून हे गित आजच्या काळात खरेच क्रांतीकारी ठरले आहे. त्याचे कारण म्हणजे हे गित, तमसो मा ज्योतिर्गमय (मला प्रकाशाकडे घेवून जा) असे सांगत नाही तर अत्त दीप भव (स्वयंप्रकाशित हो) असे सांगून बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाण्याचे सांगत आहे. (MGM University, Aurangabad)
या गिताची संकल्पना कुलपती अंकुशराव कदम यांची आहे. त्यांच्या संकल्पनेनुसारच प्रा. संजय मोहोड यांनी या गीताची रचना केली असून त्यानीच संगितबद्ध सुद्धा केले आहे. तर प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमुर्ती यांनी या गीताला गायिले आहे (MGM University Official Anthem sung by the famous playback singer Kavita Krishnamurthy. The anthem has been released on 9th April 2021 and liked by thousands of social media users.). गीतासाठी नरेंद्र भिडे यांनी संगित संयोजन केले आहे. हे गीत खालीलप्रमाणे आहे.
अत्त दीप भव भव प्रदीप भवस्वरुप - रुप भव हो ज्ञान सब्ब विज्ञान सब्ब भवसब्ब दीपो भव हो II धृIIअत्ताही अत्तनो नाथोअत्ताही अत्तनो गतीअत्त मार्गपर अप्रमादसे है तुझे चलनासब्ब का कल्याण हो, वो कार्य कुशल करनासब्ब का उत्तम मंगल,पथप्रदर्शक होअत्त दीप भव भव प्रदीप भवस्वरुप - रुप भव होज्ञान सब्ब विज्ञान सब्ब भवसब्ब दीपो भव हो II धृIIबुद्धं सरणं गच्छामीधम्मं सरणं गच्छामीसंघं सरणं गच्छामी
या गीतामध्ये स्वयंप्रकशित होण्याचा संदेश देण्यात आला आहे. तसेच "अत्ता ही अत्तनो नाथो, अत्ता हि अत्तनो गति।" असा संदेश भगवान् बुद्ध यानी दिला आहे. त्याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती स्वत:चा स्वामी आहे, आणि आपली गती म्हणजेच आपला उद्धार स्वत:च करीत असतो. थोडक्यात मणूष्य मात्राला कोणत्याही दैवी शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच चांगले कर्म करा, चांगले मार्गदर्शक व्हा, जेणे करून सर्वांचे कल्याण होईल, असा संदेशही देण्यात आला. एवढ्यावर न थांबता, या गीताने, बुद्ध (ज्ञान), धम्म (जिवन जगण्याचा मार्ग) आणि संघ (समाज) याना शरण जाण्याचा सल्लाही दिला आहे.
9 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने लोकर्पण झालेल्या या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून गायिका कविता कृष्णमुर्ती, कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, एमजीएमचे कुलगुरू डॉ. सुधिर गव्हाणे, गितकार-संगितकार संजय मोहोड, मुक्ता भिडे, कुलसचिव डॉ. अशिष गाडेकर यांची उपस्थिती होती. (Chancellor of MGM University Ankushrao Kadam, Vice-Chancellor of MGM Dr. Sudhir Ghavhane, Vice-Chancellor of Dr. BAMU, Aurangabad Dr. Pramod Yeole and others were present on the occasion)
आयआयटी, मुंबई येथून एमटेक केलेल्या कमलकिशोर कदम यानी त्यांच्या सहकार्यासोबत एमजीएम ही शिक्षण संस्था 1982 मध्ये स्थापन केली आहे. आजही ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था आज केवळ एक शिक्षण संस्था राहिली नसून 2019 मध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. अंकुशराव कदम हे कुलपती असून डॉ. सुधिर गव्हाणे हे कुलगुरू आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी, दिनांक 14 एप्रील 2021 रोजी 130 वी जयंती आहे. भारतात आज जो काही बुद्ध धम्म दिसत आहे, बुद्ध विचार कानावर पडत आहेत, त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. एमजीएम विद्यापीठाने आपल्या विद्यापीठ गीतातून विज्ञानवाद, बुद्धिवाद, बुद्ध, धम्म, संघ, बहुजन कल्याण सांगितले आहे. आणि हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरत आहे. तसेच एखाद्या विद्यापीठाने बुद्ध संदेश सांगणारे "अत्त दीप भव...." हे आपले विद्यापीठ गीत म्हणूनच स्वीकारावे ही बुद्ध काळानंतर आधुनिक इतिहासातील खरेच क्रांतिकारी बाब आहे.
Tags:
Atta Deep Bhav
Bahujan
Bhim Jayanti
Breaking
Dr. Ambedkar Jayanti
Kamalkishor Kadam
latest
MGM University
Singer Kavita Krishnamurti
University Athem