सेनगाव तालुक्यातील साखरा येथे ८२ वर्षीय महिलेचा खून

सेनगाव:- तालुक्यातील साखरा येथे एका ८२ वर्षीय महिलेचा खून करून तिचा मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर एका नाल्यात पुरून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
या याबाबत प्राथमिक माहिती अशी, की साखरा येथे सदर खून झालेली महिला भारजाबाई मारोती इंगळे (वय ८२ वर्ष) तिच्या ४ मुलांपासून वेगळी राहत होती. शनिवारी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात खून्यांनी सदर महिलेचा खून करून तिचा मृतदेह गावा पासूनच जवळ असलेल्या साखरा तांडा भागात एका नाल्यामध्ये पुरून टाकण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गावातील लोक जागी झाले. त्यानंतर खुनी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढून पसार झाले. याबाबत साखरा येथील ग्रामस्थांनी सेनगाव पोलिसांना खुनाबद्दल सांगितले. 

सेनगाव पोलीस, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत पोलीस अधिक तपास करून गुन्हा दाखल करीत आहेत. सदर मयत महिला ही तिच्या ४ मुलांपासून विभक्त राहते. चारही मुले गावातच असून सदर महिलेचा खून का करण्यात आला आणि या घटनेतील गुन्हेगार कोण आहेत? याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याबाबत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपी हे संशयित असल्याने पोलिसांनी त्यांची नावे उघड केली नाहीत. त्यांच्याकडून काय माहिती समोर येते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

जगन्नाथ पुरी यांच्याकडून साभार....

Post a Comment

0 Comments