वधू पित्यास १० जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणारा विरुद्ध धडक कारवाई

सेनगाव:- जिल्ह्यासह तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कलम 144 लागू असताना व तसेच कोविंड 19 या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून याची चोख खबरदारी घेण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू असताना तालुक्यातील जयपूर जिरे व सेनगाव येथील सुरुची हॉटेल मध्ये विनापरवाना विवाह करणाऱ्या वधूपिता सह दहा जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात कोविंड 19 या गंभीर संसर्गजन्य आजाराचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढ होताना पाहावयास मिळत आहे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नियमावली नागरिकाकडून पाळल्या जात नसल्याने राज्यात कोविंड-19 या आजाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे आपल्या जिल्ह्यात कोविंड-19 या संसर्गजन्य आजाराची रुग्ण संख्येत वाढ नये यासाठी जिल्हा शासन खबरदारीचे उपायोजना करत आहे त्यामध्ये जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यामध्ये आपले कर्तव्य पणाला लावून कर्तव्य बजावताना पाहावयास मिळत आहे संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कलम 144 लागू करण्यात व तसेच संपूर्ण जिल्ह्यात सात दिवसीय लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेले असल्याने यामध्ये वैद्यकीय सेवेचा इतर अत्यावश्यक सेवेमध्ये सूट देण्यात आली असून यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याची जिल्ह्यातील नागरिकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे परंतु तालुक्यातील अनेक नागरिकाकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केल्या जात असल्याचा प्रकार तालुक्यात पहावयास मिळत आहे त्यामध्ये जयपूर जिरे येथे विनापरवाना लग्नासाठी लागणारे साहित्य जमा करून व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करणार्‍याविरुद्ध फ्रीयादी पोलीस उपनिरीक्षक अभय दीनानाथराव माकणे यांच्या फिर्यादीवरून वधूपिता सह 10 जणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आम्ही तर जनतेच्या सुरक्षेसाठी:- पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील
सेनगाव ठाणे हद्दीत जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध होत असलेले धाडसत्र व अवैध धंद्या विरुद्ध कारवाया आपणासाठी असून आम्ही केवळ जनतेचे जनसेवक असून आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठीच आहोत यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी केले आहे.
सध्या कोविंड-19 या गंभीर संसर्गजन्य आजाराची साखळी प्रचंड वाढत आहे यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे कायदा-सुव्यवस्था बाधित होणार नाही यांची काळजी घ्यावी हद्दीत होत असलेल्या छुप्या पद्धतीने होत असलेली दारू विक्री व इतर अवैध धंदे असल्यास नागरिकांनी त्या विरुद्ध धाडसत्र व कारवाईसाठी सर्वतोपरी मदत करावी व आपल्या गावात होत असलेल्या अवैध धंद्या बाबत सेनगाव पोलिसांना निसंकोचपणे माहिती द्यावी जेणेकरून अवैध धंदे चालकाविरुद्ध पोलिसांकडून कडक शासन करण्यासाठी सोयीचे होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी केले आहे.

त्यामध्ये आरोपी वधूपिता कैलास शंकर पायघन, नारायण हरिभाऊ पायघन, संभाजी लिंबाजी पायघन, बळीराम सखाराम पायघन, रामेश्वर नामदेव पारीसकर, प्रभाकर श्रीरंग पायघन, अशोक विठोबा पायघन, सर्व राहणार जयपूर जिरे तालुका सेनगाव यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर 102/2021 कलम 188,269,270 भादवि सह कलम 5( राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र कोविंड-19 उपायोजना 2020 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सेनगाव शहरातील सुरुची हॉटेलमध्ये विनापरवाना लग्नसोहळ्याची परवानगी नसताना लग्नसमारंभात लोकांना एकत्र जमुन लग्न लावून देऊळ लोकांना जेऊ घालत असताना मिळून आले असता फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप किसनराव नाईक यांच्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल दिनकरराव देशमुख विकास राव प्रल्हादराव देशमुख सर्व राहणार पानकनेरगाव भागवतराव राजे राहणार वनोजा ता .जी. वाशिम यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 98/2021 कलम 188 269 270 भा द वि व कलम 51( ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र कोविंड उपायोजना 2020 कलम 11 कलम 37(1)(3) मुंबई पोलीस कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तहसील कार्यालय परिसरात स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या दुकानाचे शेटर उघडे ठेवून रजिस्ट्रीचे कागद पत्राचे काम करीत असताना आढळून आल्यामुळे खाजगी रजिस्ट्री एजंट विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी बालाजी शंकर गोरे रा. पळसी ता सेनगाव स्वप्निल शिवाजी गोरे रा बळसोंड ता जि हिंगोली कैलास प्रकाश अवचार रा सापडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक100/2021 कलम 188 269 भादवि कलम 51( ब) आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध सेनगाव पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध धडक कारवाईचे सत्र चालू असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात सेनगाव पोलिसांकडून कारवाई केल्या जात आहे.

बबन सुतार यांच्याकडून साभार....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या