बुद्ध जयंती निमित्त गीतांजली पार्क येथे बैठक...

हिंगोली:- शहारातील गीतांजली पार्क नगरात बुद्ध जयंती निमित्त बैठक घेण्यात आली. तसेच पंचशील झेंड्यासाठी नवीन स्तंभ उभारण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बधु उपासक, बहुजन बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाला राहूल खिल्लारे, अमित कळासरे, बाळू सूर्यतळ, अक्षय इंगोले, अमर मोरे, ॲड. रावण धाबे, सचिन तपासे, दिपक खिल्लारे,  योगेश नरवाडे, संघपाल रसाळ, अतूल शेळके, नितीन तपासे, प्रा . पदमानंद सोनकांबळे, वैशाली केशवे,  माधवी साळवे, कमल पोघे, वंदना धुळे, जावेदभाई, कडूजी टापरे आदी भीमसैनिक व गीतांजली पार्क आणि कमला नगर, छत्रपती शाहू नगर, सम्राट नगर, सीताराम नगरी, सिद्धार्थनगर आदी भागातील तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले. ठिकाणी दरवर्षी बुद्ध पौर्णिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या जयंती, स्मरण दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात.

या ठिकाणी भविष्यात वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आदी लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राबविण्यात येणारे उपक्रम लोकसहभागातून होणार असून या उपक्रमांसाठी नागरिकांनी स्वतःहून समोर येत भविष्यात अर्थसहाय्य आणि इतर सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या