प्रियकरासोबत लावले पत्नीचे लग्न

भागलपूर जिल्ह्यातील उदार पतीची होतेय सर्वत्र चर्चा

लग्न हे एक पवित्र बंधन आहे. लग्नानंतर पती-पत्नी हे मनानेही एक होतात. परंतु लग्नानंतर विवाहबाह्य संबंधाच्याही बऱ्याच घटना समोर येत आहेत. लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोला इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याचंही बऱ्याचदा उघड झालंय. विशेष म्हणजे लग्नानंतरही बायका आपल्या प्रियकराबरोबर पळून गेल्यात. पण बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंजमध्ये पतीच्या त्यागाचं एक मूर्तिमंत उदाहरण समोर आलंय. 
विवाहानंतर पत्नीला एका परपुरुषावर प्रेम जडलं, तर नवऱ्यानं थेट त्या दोघांचं लग्नच लावून दिलंय. या घटनेची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर दोन मुलांच्या आईला एका परपुरुषावर प्रेम जडलं. जेव्हा ही गोष्ट तिच्या नवऱ्याला समजली, तेव्हानं त्यानं पोटच्या मुलांचाही विचार न करता पत्नीचं त्या परपुरुषाबरोबर लग्न लावून दिलंय. बिहारमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, अनेक जणांनी त्या दोघांना पाहण्यासाठी एकच गर्दी केलीय.

बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंज इथल्या खगडिया जिल्ह्यातील सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंजमधील उत्तम मंडल यांच्याशी लग्न झालं होतं. विवाहानंतर सुरुवातीला त्यांचा सुखी संसार सुरू होता. परंतु कालांतरानं विवाहितेला एका परपुरुषावर प्रेम जडले. त्या तरुणाची विवाहितेची जवळीक वाढत गेली आणि ही गोष्ट पतीला समजली.

त्याचं झालं असं की, पत्नीचं एका परपुरुषासोबत प्रेम असल्याचं समजल्यानंतर पती चांगलाच संतापला. त्यानंतर त्यानं पत्नीवर पाळत ठेवली, तसेच तिच्या या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध केला. त्या तरुणामुळे पती-पत्नीमध्ये बरेच कलहही निर्माण झाले. पण पत्नी सपना काही थांबण्याचं नाव घेत नव्हती, तिनं त्या तरुणाबरोबर आपले संबंध सुरूच ठेवले. विशेष म्हणजे याला घरच्यांनी आणि नवऱ्याने विरोध केला. पण सपना कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पत्नीच्या जिद्दीपुढे अखेर पतीनं हार स्वीकारली आणि दोघांचे लग्न लावून दिले. पत्नीनं राजू कुमार नावाच्या पत्नीच्या प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिलं.
सुल्तानगंजमधील दुर्गा मंदिरात दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत लग्न

सुल्तानगंजमधील दुर्गा मंदिरात दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत हे लग्न झालं. यावेळी संबंधित महिलेची दोन मुलंसुद्धा लग्नात हजर होती. पत्नीचं परपुरुषाबरोबर लग्न होत असल्याचं पाहताना पतीचेही डोळे पाण्यानं भरले. बायकोच्या प्रेमाखातर पतीनं मोठा त्याग करत तिचं परपुरुषासोबत लग्न लावलं. अशा विशेष म्हणजे पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वादसुद्धा दिलेत. ही घटना बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली असून, अनेक जणांनी त्या दोघांना पाहण्यासही गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या