तीन महिन्यांपासून वेतनच नाही; हिंगोली नगर परिषद कर्मचाऱ्यांचे फिती लावून निषेध आंदोलन

आज आंदोलनाचा पहिला टप्पा

छाया:- विजय गुंडेकर, हिंगोली.
हिंगोली:- येथील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करत काळ्या फिती लावून आज कामकाज करण्यात आले. नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या मागील तीन महिन्यापासून पगार झाल्या नसल्याच्या कारणाने आज दिनांक 1 एप्रिल रोजी हिंगोली येथील नगरपालिका येथे नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी काळया फिती लावून शासनाचा निषेध केला.

15 एप्रिल रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास एक मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहे. हिंगोली येथील नगरपालिकेच्या आवारात संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वाखाली आज काळया फिती लावून अधिकारी कर्मचारी यांनी शासनाचा निषेध केला.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हाअध्यक्ष बाळू बांगर, उमेश हेंबाडे, श्याम माळवतकर, कनिष्ठ अभियंता तसनीम सनोबर, प्रिया कोकरे, देवीसिंग ठाकूर, गजानन बांगर, गजानन टाले, विजय शिखरे, संजय दोडल, रधुनाथ बांगर, आसोले, शाहीद पठाण, संदिप कांबळे, दिनेश वर्मा, झिंगराजी वैरागडे, गजानन आठवले, नगरपालिकेतील सर्व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काळया फिती लावून निषेध केला त्यानंतर कर्मचारी आपले कामकाज सुरू केले.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत संवर्ग कामगार संघटनेचा आंदोलनाला विरोध

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरणा चे थैमान वाढला असल्यामुळे संप करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रात 267 नगरपरिषद, 129 नगरपंचायत अशा एकूण 369 नगरपरिषद, नगरपंचायत आहेत. त्यापैकी 18 ते 15 नगरपरिषद त्यांच्यासोबत दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे. सध्या आमच्या संघटनेचा संप करण्याचा कोणताही हेतू नाही. कोरोना काळात नगर परिषद कर्मचारी वर्गाने शासनाला व जनतेला वेठीस धरू नये, असे मी संघटनेच्यावतीने आवाहन करीत आहे. शासनाकडे पगार शिल्लक होता तो 30 तारखेला मिळाला आहे.

डी. पी. शिंदे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कामगार संघटना.
तर महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत संवर्ग कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास विरोध केला आहे. आंदोलन करणारे लोक आणि त्यांचे नेते खोटी माहिती देत असून नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे नव्हे तर केवळ 1 महिन्याचे वेतन शिल्लक असून महाराष्ट्रातील मोजक्याच नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे, असे या संघटनेचे प्रमुख डी.पी. शिंदे यांनी सांगितले आहे. तशी आकडेवारी सुद्धा शिंदे यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post