आझाद समाज पार्टीच्या वाशीम जिल्हा प्रमुखपदी इंजि. अजय घुगे

वाशिम:- संपूर्ण देशात निळे वादळ निर्माण करणाऱ्या भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमूख ॲड. चंद्रशेखर रावण आझाद यांच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टीच्या वाशिम जिल्हा प्रमुखपदी इंजिनियर अजय घुगे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला वाशिमचे आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी ॲड. सचिन पट्टेबहादूर, हिंगोलीचे जिल्हा प्रमुख ॲड. रावण धाबे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय प्रमुख ॲड. चंद्रशेखर आझाद, महाराष्ट्र प्रमुख भाई राहुल प्रधान यांच्या आदेशाने ॲड. पट्टेबहादुर यांनी ही नियुक्ती केली आहे.
आझाद समाज पार्टी वाशीमचे नूतन नवनियुक्त जिल्हा प्रमुख म्हणून प्रसिद्ध उदयोजक, सामाजिक कार्यकर्ते, उच्च विद्याविभूषित इंजि. अजय दयाराम घुगे यांची निवड झाल्याने जिल्हाभर त्यांचे स्वागत होत आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर मालेगाव तालुक्यातील मारसूल या त्यांच्या मूळ गावी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने